ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभा : अकोल्याचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार? - akola assembly election

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये कैद झाले आहे. जनतेचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याचा निर्णय २४ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर समजणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

महाराष्ट्र विधानसभा : अकोल्याचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार
author img

By

Published : Oct 23, 2019, 1:00 PM IST

अकोला - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला म्हणून राज्यात ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यात यंदा मतदारांनी कोणाला कौल दिला हे २४ तारखेला समोर येणार आहे. या जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात तिरंगी लढत झाली आहे. २१ ऑक्टोबरला झालेल्या मतदानात जिल्ह्यात ५६.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१४ च्या तुलनेत (६१.२० टक्के) साधारण पाच टक्क्यांनी मतदान घसरले आहे. अॅड. आंबेडकरांचा बालेकिल्ला म्हटले जात असले तरी, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत येथील पाच पैकी चार मतदारसंघात भाजपने विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली होती.

२८ - अकोट विधानसभा मतदारसंघ

अकोट विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये ६०.७८ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत अकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या प्रकाश भारसाखळे यांनी ७० हजार ०८६ एवढी मते घेत काँग्रेसच्या महेश गणगणे यांचा ३१ हजार ४११ मतांनी पराभव केला होता. गणगणे यांना ३८ हजार ६७५ इतकी मते मिळाली होती. २०१४ च्या विधानसभेला सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. परंतू यंदाची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी महायुतीकडून भाजपचे प्रकाश भारसाखळे पुन्हा नशिब आजमावत आहेत. तर यंदा आघाडीकडून काँग्रेसच्या संजय बोडके यांना संधी देण्यात आली आहे. तर संतोष रहाटे वंचित कडून आणि रविंद्र फाटे हे मनसे कडून लढत आहेत. २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढला असून यंदा ६३.८३ टक्के इतके मतदान झाले असून या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे पहावे लागेल.

२९ - बाळापूर विधानसभा मतदारसंघ

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळापूर मतदारसंघात ६०.२८ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघातून भारीपच्या बळीराम सिरसकर यांनी ४१ हजार ४२६ एवढी मते घेत काँग्रेसच्या सईद नतीकुद्दीन खतीब यांचा ६ हजार ९३९ मतांनी पराभव केला होता. खतीब यांना ३४ हजार ४८७ मते मिळाली होती. २०१९ विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने येथून सेनेच्या नितिन तळे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम गावंडे यांचे आव्हान आहे. वंचितकडून डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि एमआयएम कडून रहेमान खान लढत देत आहेत. २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढला असून यंदा ६३.०० टक्के इतके मतदान झाले असून या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे पहावे लागेल.

३० - अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघात ५१.७९ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या गोवर्धन शर्मा यांनी ६६ हजार ९३४ एवढी मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय देशमुख यांचा ३९ हजार ९५३ मतांनी पराभव केला होता. देशमुख यांना २६ हजार ९८१ इतकी मते मिळाली होती. यावेळी या मतदारसंघातून भाजपचे गोवर्धन शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासमोर काँग्रेसच्या साजिद खान मन्नन खान (पठाण) आणि वंचितच्या मदन भारगड यांचे आव्हान आहे. यंदा या मतदारसंघात ५१.१० टक्के इतके मतदान झाले आहे.

३१ - अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला पूर्व मतदारसंघात ५६.०१ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या रणधीर सावरकर यांनी ५३ हजार ६८७ एवढी मते घेत भारिपच्या हरिदास भडे यांचा २ हजार ४४० मतांनी पराभव केला होता. भडे यांना ५१ हजार २३८ मते मिळाली. या मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे सुभाषचंद्र कोरपे होते. यावेळी या मतदारसंघातून भाजपच्या रणधीर सावरकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर विवेक पारकस्कर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच हरिदास पंढरी भदे हे वंचितकडून लढत आहेत. यंदा या मतदारसंघात ५६.८० टक्के इतके मतदान झाले आहे.

३२ - मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुर्तिजापूर मतदारसंघात ५३.४६ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. या निवडणुकीत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या हरीश पिंपळे यांनी ५४ हजार २२६ एवढी मते घेत भापीपच्या राहुल डोंगरे यांचा १२ हजार ८८८ मतांनी पराभव केला होता. डोंगरे यांना ४१ हजार ३३८ मते मिळाली. या मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे महादेव गवळे, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे श्रावण इंगळे राहिले होते. २०१९ विधानसभेसाठी या मतदारसंघातून यंदा भाजपचे हरीश पिंपळे हे निवडणुक लढवत असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रविकुमार राठोड तर वंचितच्या प्रतिभा अवचर यांचे आव्हान आहे. यंदा या मतदारसंघात ५५.०० टक्के इतके मतदान झाले असून वाढलेल्या मतदानामुळे या मतदासंघात चुरस निर्माण झाली आहे.

Intro:Body:

state news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.