अकोट(अकोला)- देशभरामध्ये लॉकडाऊन लागू असतानाही परराज्यातील मजूर आपल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. गुरुवारी अकोट शहरातील सीमा ओलांडत दहा ते पंधरा ट्रॅक्टर भरून मजूर जात होते. या सीमांवर पोलिसांची बॅरिकेट लावलेले असतानाही त्यांना कोणीही थांबवू शकले नाही
हे मजूर मध्यप्रदेश मधील असल्याचे बोलले जात आहे. ते जळगाव येथे कामासाठी गेले असल्याचेही समजते. मात्र, जळगावपासुन ते अकोटपर्यंतचा त्यांचा प्रवास अविरतपणे ट्रॅक्टरमधून सुरू आहे. या मजुरांना पुरविण्यासाठी कुठल्याच प्रकारची सोपस्कार प्रशासनाकडून करण्यात आले नाही.
प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये 20 ते 25 महिला व पुरुष मजूर होते. हे मजूर आले कधीपासून प्रवास करत आहेत?, या मजुरांना कोणी का अडविले नाही?, त्यांची आरोग्य तपासणी झाली आहे का?, असे प्रश्न उपस्थित होत आहे.