ETV Bharat / state

अकोल्यात सर्वांगीण बाल विकास शिबिराचे आयोजन - आयोजन

जिल्ह्यातील अकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्यावतीने मागील 10 वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी 1 महिन्याच्या निवासी सर्वांगीण बाल विकास शिबिराचे आयोजन करण्यात येते.

अकोल्यात सर्वांगीण बाल विकास शिबिराचे आयोजन
author img

By

Published : May 20, 2019, 8:03 AM IST

अकोला - जिल्ह्यातील अकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्यावतीने मागील 10 वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी 1 महिन्याच्या निवासी सर्वांगीण बाल विकास शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराची सुरुवात विदर्भ माऊली संत वासुदेव महाराजांनी 60 वर्षांपूर्वी केली होती. तोच वारसा संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अखंडपणे चालवत आहे.

अकोल्यात सर्वांगीण बाल विकास शिबिराचे आयोजन

या शिबिरात मुलांना अध्यत्मिक शिक्षणासह खेळ, योगासन आदीचे धडे दिले जातात. बालवयात मुलांवर केलेले संस्कार हे कायम लक्षात राहतात, या उद्देशाने अध्यात्मिक सामजिक सेवेचा वसा घेतलेल्या या संस्थेचे बालविकास शिबीर अकोटमधील श्रद्धासागर या निसर्गरम्य परिसरात आयोजित केले जाते. यामध्ये दररोज पहाटे उठणे, प्राणायाम करणे, संस्कृत पठण, हरिपाठ, पारंपारिक वाद्य वादन, मर्दानी खेळ, पोवाडा, गायन, वारकरी संप्रदायातील संस्कृत श्लोक यासह मानवी जीवनाचा अभ्यास करत जगण्याची कला मुलांना शिकवली जाते.

2001 साली स्थापन झालेल्या वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे कार्य आज देशभरात परसले आहे. सामाजिक सेवेचा वारसा लाभलेल्या या संस्थेने पंढरपूर येथे भक्तांसाठी धर्मशाळा उभारली आहे. देशात पाश्चात्त्य संस्कृतीचे होणारे अनुकरण थांबवण्यासाठी व विद्यार्थी दशेतील पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्यावतीने कोणताही शुल्क न घेता हा उपक्रम नव्या पिढीतील मुले घडवण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी आहे.

Intro:अकोला - शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुले एक तर मामाच्या गावी, निसर्गाच्या सानिध्यात किंवा विविध क्लासला जातात. परंतु, जिल्ह्यातील अकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने मागील दहा वर्षापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत एका महिन्याचे निवासी सर्वांगीण बाल विकास शिबिराचे आयोजन केले जाते. ज्या शिबिराची सुरवात विदर्भ माऊली संत वासुदेव महाराजांनी साठ वर्षांपूर्वी केली होती. तोच वारसा संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अखंडपणे चालवत आहे. या शिबिरात मुलांना आध्यत्मिक शिक्षनासह खेळ, योगासनसह आदीचे धडे मुलांना दिल्या जाते.Body: बालवयात केलेले संस्कार हे कायम लक्षात राहतात या उद्देशाने अध्यात्मिक सामजिक सेवेचा वसा घेतलेल्या या संस्थेचे बालविकास शिबीर अकोटमधील श्रद्धासागर या निसर्गरम्य परिसरात आयोजित केले जाते. ज्यामध्ये दररोज पहाटे उठणे, प्राणायाम करणे, संस्कृत पठण,हरिपाठ,पारंपारिक वाद्य मृदुंग वादन,मर्दानी खेळ फुगडी,पोवाडा गायन,वारकरी संप्रदायातील संस्कृत श्लोक यासह मानवी जीवनाचा अभ्यास करीत जगण्याची कला शिकून माणूस कसा घडावा हे शिक्षण दिले जाते. 1 मे पासून सुरू झालेल्या या निवासी शिबिरांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातील शेकडो मुले सहभागी असून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचे खेळ तांत्रिक खेळ बाजूला सोडून मर्दानी खेळ हरिपाठ, आपल्या संस्कृतीला आत्मसात करायला लावणारी अशा प्रकारची बाल संस्कार शिबिर महाराष्ट्रभर सुरू होणे गरजेचे आहे.
देशात पाश्चात्त्य संस्कृतीचे होणारे अनुकरण थांबवण्यासाठी व विद्यार्थी दशेतील पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्यावतीने कुठलेही शुल्क न घेता चालवला जाणारा हा समाजोपयोगी उपक्रम नवी पिढीतील मुले घडवण्याच्या दृष्टीने निश्‍चितच प्रेरणादायी आहे.- 2001 साली स्थापन झालेल्या संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे कार्य आज देशभरात परसलेले असून सामाजिक सेवेचा वारसा लाभलेल्या या संस्थेने पंढरपूर येथे भक्तांसाठी उभारलेली धर्मशाळा ही सामजिक प्रेरणेचा विचार मांडणारी असून संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेसारख्या संस्था गावोगावी सुरू झाल्यास निश्चितच गावांचा विकास होण्यासाठी मैलाचा दगड ठरतील हे निश्चित.Conclusion:सूचना - व्हिडीओ सोबत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.