ETV Bharat / state

नव्वद वर्षांचे 'कोरोना वॉरियर्स'... 'अशाप्रकारे' जपताहेत सेवा भाव

author img

By

Published : May 7, 2020, 9:29 PM IST

इच्छाशक्ती असेल तर कोरोना सारख्या संकटाच्या काळात समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचा प्रयत्न करता येतो. हे 94 वर्षीय महादेवराव भगत व 88 वर्षीय कलावती भगत या वृद्ध दाम्पत्याने दाखवून दिले आहे.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र

अकोला - इच्छाशक्ती असेल तर कोरोनासारख्या संकटाच्या काळात समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचा प्रयत्न करता येतो. हे अकोल्यातील महादेवराव भगत (वय 94 वर्षे) व कलावती भगत (वय 88 वर्षे) हे या वृद्ध दाम्पत्याने दाखवून दिले आहे. कपडे शिवण्याच्या कलेच्या माध्यमातून आतापर्यंत या जोडप्याने हजार मास्क तयार करून सामाजिक संस्थांना विनामूल्य दिले आहेत. संकटकाळी समाजाला आधार देणाऱ्या वृद्ध दाम्पत्याने युवकांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

नव्वद वर्षांचे 'कोरोना वॉरियर्स
भगत यांना शेजारी राहणाऱ्या गुजराती परिवाराने तोंडाला लावण्यासाठी तीन मास्क आणून दिले. कलावती भगत यांनी आपल्या पतीला असे मास्क वितरणासाठी तयार करण्याचे सुचविले. आधीच्या काळात शिवणकामासोबतच शेती, गायन, हार्मोनियम वादन, आदी छंद जोपासणारे महादेवराव भगत यांनी स्वखर्चाने कापड व इतर साहित्य आणून मास्क तयार केले. त्यानंतर मास्क वितरणाचा यज्ञ त्यांनी सुरू केला. त्यांचे सेवानिवृत्त पुत्र प्रभुदास भगत यांनीही या कार्यात त्यांचा सहभाग नोंदविला. या तिघांच्या परिश्रमामुळे विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्याकडून हजारो मास्क विनामूल्य नेले आहेत. हे मास्क कोरोना संसर्ग प्रतीबंध करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी वापरल्या जात असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या बिकट परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करत आहे. या सामाजिक देवाणघेवाणीमध्ये आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून त्यांनी हे मास्क तयार केले आहे. भगत कुटुंबीय हे मास्क ते विकत नसून तर ते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गरजूंना मोफत देतात. रेड क्रॉस सोसायटीला भगत कुटुंबांनी दोनशे मास दिले आहेत. रेडक्रॉस सोसायटीचे मानद सचिव प्रभजितसिंग बछेर, राजू बूडुकले, मानत व्यवस्थापक मोहन काजळे यांना वितरीत करण्यात आले.

हेही वाचा - अकोलाकरांची वाढली चिंता; दिवसभरात 13 कोरोना पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.