अकोला - जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना ईडीची नोटीस ( Notice of ED to Superintendent of Police ) आली आहे. यासंदर्भात त्यांना 17 तारखेला मुंबई येथे हजर राहण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र, नेमकं कोणत्या कारणासाठी ईडीने नोटिस बजावली आहे, हे अद्यापही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे ( Superintendent of Police G. Sridhar ) बीड येथे पोलीस अधीक्षकपदी असताना त्यांची वक्फ बोर्डकडे ( Waqf Board ) तक्रार झाल्याचे समजते. त्यांच्यासोबत तत्कालीन जिल्हाधिकारी यांचीही तक्रार झाली असल्याचे समजते. तत्कालीन जिल्हाधिकारी यांची ईडी येथे चौकशी झाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळालेल्या नोटिसमधून नेमकं प्रकरण समजू शकले नाही आहे. याबाबत त्यांच्याशी मोबाईलवर संभाषण झाल्यावर त्यांनी ईडीची नोटीस आल्याचे सांगितले असून 17 डिसेंबरला हजर राहण्याचे म्हटले आहे. परंतु, नेमके कारण माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.