ETV Bharat / state

अकोल्यात नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये ४ उमेदवारांचे अर्ज नामंजूर - नामनिर्देशन पत्र

अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत १६ उमेदवारांपैकी ४ जणांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये नामंजूर करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Mar 27, 2019, 11:31 PM IST

अकोला - लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत १६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी ४ उमेदवारी अर्ज नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये नामंजूर करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन भवनमध्ये अकोला लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. ही छाननी निवडणूक निरीक्षक विनोदसिंग गुजियाल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन सुरंजे, तहसीलदार बीजवल यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नामनिर्देशन छाननीमध्ये प्रल्हाद अश्रूजी देबाजे, भानुदास संपतराव वानखडे, संदीप बाबुराव हिवराळे आणि गजानन शांताराम तायडे यांचे नाम निर्देशन पत्र नामंजूर करण्यात आले आहे. बहुजन समाज पार्टीचे बी. सी. कांबळे, भाजपचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे अरुण कंकर वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रविण लक्ष्मण भटकर, अपक्ष गजानन हरणे, अपक्ष अरुण ठाकरे, अपक्ष देवानंद इंगळे, अपक्ष प्रविण पुरिया, अपक्ष मुरलीधर पवार, अपक्ष सचिन शर्मा, असे एकूण १२ उमेदवारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहे. अकोला लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २९ मार्च आहे.

Intro:अकोला - अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत 16 उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी मतदार संघाच्या नामनिर्देशन पत्र छाननी मध्ये 4 उमेदवारी अर्ज नाममंजुर करण्यात आले.

Body:जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन भवनमध्ये अकोला लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निरीक्षक सामान्य विनोदसिंग गुजियाल यांचे उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन सुरंजे, तहसीलदार बीजवल यांच्यासह व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नामनिर्देशन छाननी मध्ये प्रल्हाद अश्रूजी देबाजे, भानुदास संपतराव वानखडे, संदीप बाबुराव हिवराळे व गजानन शांताराम तायडे यांचे नाम निर्देशन पत्र नामंजूर करण्यात आले आहे.
बहुजन समाज पार्टीचे बी. सी. कांबळे, भाजपचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे अरुण कंकर वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे अड. प्रकाश आंबेडकर, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रवीण लक्ष्मण भटकर, अपक्ष गजानन हरणे, अपक्ष अरुण ठाकरे, अपक्ष देवानंद इंगळे, अपक्ष प्रवीण पुरिया, अपक्ष मुरलीधर पवार, अपक्ष सचिन शर्मा असे एकूण बारा उमेदवारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहे. अकोला लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 29 मार्च आहे.

Conclusion:सूचना - सोबत व्हिडिओ पाठवला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.