ETV Bharat / state

अकोल्यातील 'काटेपूर्णा' प्रकल्पाला पाण्याची प्रतीक्षा, पाऊस न झाल्यास प्रकल्प कोरडा होण्याची भीती - -katepurna-dam

अकोला शहर व परिसराला पाणी पुरवठा करणारा 'काटेपूर्णा प्रकल्प' अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्याचा एक महिना उलटूनही प्रकल्पात नवीन पाण्याचा एक थेंबही जमा न झाल्याने, अकोलेकरांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अकोल्यातील 'काटेपूर्णा' प्रकल्पाला पाण्याची प्रतीक्षा
author img

By

Published : Jul 9, 2019, 4:42 PM IST

अकोला - शहराची तहान भागवणारा प्रकल्प म्हणून 'काटेपूर्णा धरणाची' ओळख आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरिही या प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. वाशिम आणि मालेगाव परिसरात पाऊस पडल्यास काटेपूर्णा प्रकल्पात पाणी जमा होते. यावर्षी वाशीम जिल्ह्यात अजूनही पावसाने अपेक्षीत हजेरी लावलेली नसल्याने, त्यामुळे या प्रकल्पात नवीन पाण्याचा एक थेंबही जमा झालेला नाही.

अकोल्यातील 'काटेपूर्णा' प्रकल्पाला पाण्याची प्रतीक्षा, ईटिव्ही भारत प्रतिनीधीचा स्पेशल रिपोर्ट

आजमितीस 'काटेपुर्णा प्रकल्पात' अवघा 4.22 दलघमी इतका पाणी साठा आहे. हा पाणीसाठा शहराला दीड ते दोन महिने पुरेल इतकाच आहे. प्रकल्पातील सध्या असणारा मृतसाठा वापरल्यास हा कालावधी आणखीन दोन ते तीन महिने वाढण्याची शक्यता आहे. जर या प्रकल्पात नव्याने पाणीसाठा झाला नाही, तर अकोलेकरांना पावसाळ्यानंतर पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. "वाशीम आणि मालेगाव परिसरात चांगला पाऊस झाला तरच हा प्रकल्प भरेल", अशी अपेक्षा प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अकोला प्रमाणेच खांबोरा आणि मूर्तीजापूर शहरांनाही याच प्रकल्पातून पाणी पुरविले जात असल्याने जिल्ह्यात पाऊस पडावा अशी प्रार्थना नागरिक करीत आहेत.

Intro:अकोला - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपुरणा प्रकल्पात 4.22 दलघमी इतका पाणी साठा आहे. हा पाणी साठा शहराला दीड ते दोन महिने पुरेल इतका आहे. भरपावसाळ्यात या प्रकल्पात अद्याप ही एक थेंब पडलेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प पावसाळ्यातच कोडा होण्याची भीती व्यक्त होत असून अकोलेकरांना पावसाळ्यानंतर पाणी टंचाई ची झळ सोसावी लागणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, वाशीम आणि मालेगाव परिसरात चांगला पाऊस झाला तर हा प्रकल्प भरेल, अशी अपेक्षा प्रकल्प वर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Body:वाशिम आणि मालेगाव परिसरात पाऊस पडल्यास काटेपूर्णा प्रकल्पात पाणी जमा होते. यावर्षी वाशीम जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी लागलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पात पाणी जमा झाले नाही मागील वर्षी जमा झालेल्या पाण्यावरच हा प्रकल्प सध्या सुरू आहे. या प्रकल्पात जर या पावसाळ्यात पाणी जमा झाले नाही. तर दीड ते दोन महिने इतका पाणीसाठा अकोला शहराला पुरविण्यात येणार आहे. त्यासोबतच खांबोरा आणि मूर्तीजापूर शहर येथे ही याच प्रकल्पातून पाणी पुरविले जात असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकल्पातील मृतसाठा वापरल्यास हा कालावधी आणखीन दोन ते तीन महिने वाढण्याची शक्यता आहे.
सध्या पावसाळा सुरू असला तरी वाशिम परिसरात पाऊस जोरात होण्याची आशा व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी पाऊस जोरात पडला तर हा प्रकल्प भरून अकोलेकरांचे तहान भागविण्यास सक्षम राहणार आहे. त्यामुळे आता वाशीम जिल्ह्यात पाऊस पडावा अशी प्रार्थना करीत आहेत.

Conclusion:सूचना - सोबत पॅकेज स्टोरी आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.