ETV Bharat / state

अकोल्यात नऊ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू - akola corona new cases

अकोल्यात आज सकाळी प्राप्त अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. यामुळे, जिल्ह्यातील मृतांचा आकडा हा ७९ वर पोहोचला आहे.

अकोल्यात नऊ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Jun 30, 2020, 3:34 PM IST

अकोला - अकोल्यात आज(मंगळवार) सकाळी कोरोना तपासणी प्राप्त अहवालानुसार नऊ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा 79 वर पोहोचला आहे.

अकोल्यात आज सकाळी प्राप्त अहवालात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दोघे बाळापूर येथील, दोघे अकोट येथील, तर चिखलगाव, सिंधी कॅम्प, कळंबेश्वर, डाबकीरोड व शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, काल रात्री दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात एक गंगानगर येथील रहिवासी असलेल्या 74 वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला 14 जूनला उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाली होती. तर अन्य एक अकोट येथील 56 वर्षीय पुरुष असून हा रुग्ण 27 रोजी रुग्णालयात दाखल झाला होता.

प्राप्त अहवाल - १९१

पॉझिटिव्ह अहवाल - ०९

निगेटिव्ह - १८२

सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १५४५

मृत - ७९ (७८+१)

डिस्चार्ज - १०९३

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ३७३

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.