अकोला - अकोल्यात शुक्रवारी सकाळी २१६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 201 जण हे निगेटिव्ह आले असून १५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच एका रुग्णाचा १८ जूनला मृत्यू झाला आहे. प्राप्त झालेल्या अहवालात आठ महिला व सात पुरुष आहेत. त्यात अकोटफैल येथील पाच, बाळापूर येथील चार, जेतवन नगर, कान्हेरी सरप, भारती प्लॉट, जुने शहर, मोठी उमरी, बार्शी टाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान, १८ जूनच्या रात्री उपचार घेताना हरिहर पेठ येथील ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून, ते कालच दाखल झाले होते.
प्राप्त अहवाल - २१६
पॉझिटिव्ह - १५
निगेटिव्ह - २०१
आता सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १ हजार १२१
मृत - ५९ (५८+१)
डिस्चार्ज - ७२४
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३८