अकोला - बुधवारी सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि सकाळी मिळालेल्या अहवालानुसार 30 अहवाल पॉझिटिव्ह असे मिळून एकूण 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत आलेल्या अहवालामधील ही सगळ्यात मोठी रुग्णांची संख्या एका दिवसात सापडली आहे. अकोला येथील पूर्ण रुग्णांच्या संख्येत हा भूकंपच आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. तर 26 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
प्राप्त अहवालात 19 महिला व 23 पुरुष आहेत. त्यात अकोट फैल येथील अकरा, रामदास पेठ येथील पाच, माळीपुरा येथील पाच, मुर्तिजापूर येथील तीन, फिरदौस कॉलनी येथील दोन, अशोक नगर येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, तर उर्वरित महसूल कॉलनी, रजतपुरा, गायत्रीनगर, सिंधी कॅम्प, गर्ल्स होस्टेल आरटीएएम, शिवसेना वसाहत, देशमुख फैल, संताजीनगर, जठारपेठ, न्यू तारफैल, गुलिस्तान कॉलनी. मोमीनपुरा येथील प्रत्येकी एक जण आहे.
26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील पाच जणांना घरी तर उर्वरित 21 जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
सद्यस्थिती
प्राप्त अहवाल- ३०८
पॉझिटिव्ह-७२
निगेटिव्ह-२३६
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ५०७
मृत- २८(२७+१)
डिस्चार्ज- ३१५
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१६४