अकोला - शहरातील टिळक रोड ते शिवाजी महाविद्यालयापर्यंत रस्त्याचे काम अर्धवट ठेवून त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (शुक्रवारी) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या खुर्चीला बेशरमची झाडे, रेती, दगड आणि माती भेट देऊन निषेध व्यक्त केला.
टिळक रोड ते शिवाजी महाविद्यालयापर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. हा रस्ता बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी रस्ता तो खराब झाला आहे. तर ज्याठिकाणी सिमेंटचे पॅचिंग केले आहे, तेही खराब झाले आहे. अकोट स्टँड ते शिवाजी महाविद्यालयापर्यंत एकतर्फी रस्ता बांधून ठेवला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. यामुळे रस्त्याच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे अनुपस्थित असल्याने त्यांच्या खुर्चीवर बेशरमची फुले, रेती, गिट्टी, सिमेंट ठेवून निषेध व्यक्त केला.
आंदोलनात बुढन गाडेकर, देवानंद टाले, संदीप ताले, अजय मते यांच्यासह आदींनी सहभाग घेतला.