ETV Bharat / state

कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची हत्या‎; तिघांना अटक - Coaching Classes Students

Akola Murder Case :बाहेरगावावरून खासगी शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची परिसरातील तीन युवकांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. विशाल मधुकर झाटे (18, रा. जळगाव जामोद) असं त्याचं नाव आहे.

Akola Murder Case
विद्यार्थ्यांची हत्या‎
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 10:24 PM IST

अकोला Akola Murder Case : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तरोडा ‎येथील विशाल हा खाजगी कोचिंग क्लास‎मध्ये शिकवणी घेत होता. तो कृषी नगर परिसरात त्याच्या काही मित्रांसह ‎‎भाड्याने खोली करून राहत होता. सोमवारी रात्री‎ कृषी नगर परिसरातील युवकांनी त्याच्याशी वाद‎ घालून त्याच्यावर शस्त्राने वार केला.‎ त्यात विशाल गंभीर जखमी झाला. त्यानंतर‎ हल्लेखोर पळून गेले. तेथील काही नागरिकांनी‎ गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विशालला‎ सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं. मात्र‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎, प्रचंड रक्तस्त्राव झाल्यानं डॉक्टरांनी विशालला मृत‎ घोषित केलं.

अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल : घटनेची माहिती मिळताच पोलीस‎ घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच उपविभागीय‎ पोलिस अधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक अभय‎ डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर‎ शेळके आपल्या ताफ्यासह दाखल झाले होते. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत यामध्ये साहील आठवले, राहूल तायडे, मंगल चव्हाण यांना ताब्यात घेतलं आहे, तिघे ही कृषी नगरात राहतात.

अनेक विद्यार्थी गेले निघून : या घटनेनंतर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थी या घटनेनंतर परिसरातून निघून गेले असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे, या परिसरात पोलिसांची गस्त नेहमी असते, असं पोलिसांचं मत आहे. तरीही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना दिला जातो त्रास? : बाहेर गावावरून शिकायला आलेल्या विद्यार्थ्याच्या‎ अगतिकतेचा फायदा घेत येथील काही गुंड या‎ विद्यार्थ्यांना धमकावत त्यांच्याकडून महिन्यापोटी‎ पाचशे ते हजार रुपये वसूल करतात, अशी चर्चा आहे. भीतीपोटी विद्यार्थी‎ त्यांच्या दबावाला बळी पडत असल्याचं बोललं जात आहे. जर विद्यार्थ्यांनी त्यांना‎ पैसे न दिल्यास त्यांना मारहाण केली जाते, अशी‎ माहिती सूत्रांनी दिली आहे.‎

हेही वाचा -

  1. Knife Attack In Thane: चहा पिण्यासाठी पैसे देण्यास नकार; गुंडाचा साथीदारावर भर रस्त्यात वार
  2. Brutal Murder in Delhi : दिल्लीत तरुणीचा निर्घृण खून, नराधम उत्तर प्रदेशातील बुलंदशरहमधून जेरबंद
  3. Thane Crime : वर्दळीच्या रस्त्यावरच तरुणावर दोन हल्लेखोरांचा चाकू हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.