ETV Bharat / state

#अनलॉक २.० : आर्थिक समीकरणं सोडवतायेत लघु उद्योजक; संपूर्ण उद्योगक्षेत्र तीन वर्षे मागे गेल्याची भावना - अकोला कोवीड बातम्या

सध्या सर्वत्र सम-विषम समिकरणानूसार दुकानं सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले. मात्र, हे लॉकडाऊन कायमचेच उठवावे, यामुळे कामाला गती मिळेल, अशी मागणी काही लघुउद्योजकांनी केली आहे.

lockdown in akola
#अनलॉक २.० : आर्थिक समिकरणं सोडवतायेत लघु उद्योजक; संपूर्ण उद्योगक्षेत्र तीन वर्षे मागे गेल्याची भावना
author img

By

Published : Jul 27, 2020, 4:41 PM IST

अकोला - कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच लहानमोठे उद्योग संकटात सापडले आहे. हातावर काम असणाऱ्यांना तर हे दिवस कसे काढावे असा प्रश्न सतावतोय. काही काळानंतर संचारबंदी शिथिल झाली. सम-विषम समिकरणानुसार दुकानं सुरू करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले. मात्र, हे लॉकडाऊन कायमचेच उठवावे, यामुळे कामाला गती मिळेल, अशी मागणी काही लघुउद्योजकांनी केली आहे. त्यातून उद्योगधंदे पूर्वपदावर येण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती करणारे कारागीर अतुल वानखडे यांनी ' ईटीव्ही भारत'कडे व्यक्त केली आहे.

#अनलॉक २.० : आर्थिक समिकरणं सोडवतायेत लघु उद्योजक; संपूर्ण उद्योगक्षेत्र तीन वर्षे मागे गेल्याची भावना

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी संचारबंदी लागली. एकाच वेळी सर्व व्यवहार थांबले. सर्वप्रथम टाळेबंदीने कामगारांच्या उदरनिर्वाहावर घाला घातला. त्याचा फटका छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना, हातावर काम असणाऱ्या मजूरांना बसला. त्यामुळे या सर्वांवर आर्थिक संकटच उभे राहिले. या संकटातून मार्ग कसा काढावा, याची चिंता अद्याप अनेकांना सतावत आहे.

lockdown in akola
हे लॉकडाऊन कायमचेच उठवावे, यामुळे कामाला गती मिळेल, अशी मागणी काही लघुउद्योजकांनी केली आहे.

जुने शहरातील इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक किंबहुना इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती करणारे कारागीर अतुल वानखडे यांनाही संचारबंदीची झळ बसली. उन्हाळ्यात कुलरचे साहित्य खरेदी करून त्यावर चांगला नफा कमवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. लाखो रुपयांचा आणलेला माल तसाच पडून राहिला. गुंणवणूक केल्याने त्यांच्याजवळ पैसाच उरला नाही. ज्या ग्राहकांना घर माहीत होते, त्यांचीच कामं ते करू शकले. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून त्यांनी कुटुंबावर येणारी आर्थिक 'संचारबंदी' दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

lockdown in akola
जुने शहरातील इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक किंबहुना इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती करणारे कारागीर अतुल वानखडे यांनाही संचारबंदीची झळ बसली.

कालांतराने अडीच महिन्यानंतर राज्य सरकारने व्यवसाय सुरू करण्यासाची परवानगी दिली; आणि काही अटी घातल्या. सम-विषम समिकरणानुसार दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले. यामुळे व्यवहार सुरू झाले असले, तरीही बाहेरून मालच येत नसल्याने ते ग्राहकांना समाधानी करू शकत नाहीत. त्यांच्यासारखे अनेक कारागीर व व्यावसायिकांना हीच समस्या भेडसावत आहे. त्यामुळे पूर्णपणे संचारबंदी काढून सुरळीत व्यवहार करण्यास राज्य शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.