अकोला : यासंदर्भात खासदार अरविंद सावंत हे प्रसार माध्यमांशी अकोल्यात बोलत होते. ( CM Shinde and BJP over RTU ACB notice ) त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. ज्यांनी आपली सत्व आणि तत्व विकली त्यांचे का ऐकायचे, असे म्हणत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. आमदार नितीन देशमुख यांच्यावर एसीबीची कारवाई, वैभव नाईक एसीबीची कारवाई, राजेंद्र साळवी एसीबीची कारवाई का म्हणून, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एसीबीने पाठविलेल्या नोटीस संदर्भात नाराजी : लोकांवर एसीबीची कारवाई उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) गटाच्या शिवसेनेतर्फे नवनिर्वाचित सरपंच सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी खासदार अरविंद सावंत हे अकोल्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार नीतीन देशमुख यांना एसीबीने पाठविलेल्या नोटीस संदर्भात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, जे मिंदे गटात गेले ते रोज कोणाला धरतात. ज्यांनी आयुष्यातील सत्व आणि तत्व विकल ते काय माणसे त्यांचे काय म्हणून धोरण ऐकायचे. म्हणून मग प्रामाणिकपणे राहणाऱ्या लोकांवर एसीबीची कारवाई होते असेही ते म्हणाले.
खासदार सावंत यांची मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपवर टीका : जे इकडून होते आणि जे त्यांच्यात गेले ते सगळे लॉन्ड्री धुऊन गेले, स्वच्छ झाले. माध्यमांनी सुद्धा याचे गांभीर्य विचारात घ्यायला पाहिजे, हे कसे स्वच्छ होतात. नितीन देशमुख जर तिकडे गेले तर नितीन देशमुख ताबडतोब काही नाही ते काहीच कारवाई नव्हती, असे ही ते म्हणाले. अरे वा ते चाणक्य तिकडे बसला आहे. महाराष्ट्रात पण एक चाणक्य बसलेला आहे. चाणक्याची युती कुणाच्या बरोबर होती शत्रूंच्या की मित्रांच्या हा एकदा विचार करावा लागेल, असे खासदार अरविंद सावंत शेवटी म्हणाले.
संपत्तीची चौकशी करण्यासंदर्भात नोटीस : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) संपत्तीची चौकशी करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. १९ सप्टेंबर रोजी आमदार नितीन देशमुख यांनी आपल्याला एसीबी चौकशीच्या धमक्या येत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेच्या मेळाव्यात केला होता. मात्र, तुरुंगात डांबले तरीही आपण शिवसेना सोडणार नाही, असे ते म्हणाले. नोटीस आली आहे. हजर राहू एसीबीची नोटीस मिळाली आहे. मात्र, तक्रार कुणी केली, याची माहिती मिळाली नाही. यावेळी त्यांनी तक्रारदारावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याच म्हंटले आहे.