अकोला - आपल्या १३ महिन्याच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या करून ( Daughter's Murder by Mother Babhulgaon Akola ) आईने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २१ मार्चच्या रात्री बाभूळगाव येथे घडली. घरातील इतर व्यक्तींच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आईला व चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले. आईवर उपचार सुरू असून चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. विवाहितीच्या पतीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ( MIDC Police Akola Babhulagaon ) असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाभूळगाव येथील प्रियंका बोबडे या महिलेने सोमवारी रात्री आपल्या १३ महिन्याच्या मुलीची गळा दाबून आधी हत्या केली. त्यानंतर तीने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घरातील इतर व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी त्या महिलेला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिलेविरूद्ध गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Minor Girl Raped Jamner : धक्कादायक.. जळगावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत गाडीतच बलात्कार..
दरम्यान, या घटनेने मागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस घेत आहे. पोलिसांनी जखमी विवाहितेंचिरोधात गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेच्या जबाणीवरून याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलिस ही यासंदर्भात काहीही बोलण्यास तयार नाही.