अकोला - मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाजवळ चारचाकीमध्ये गुटखा नेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने तो पकडला. ही कारवाई आज (दि. 17 नोव्हेंंबर) दुपारी करण्यात आली. या कारवाईमुळे अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुर्तीजापूर रेल्वे परिसरामध्ये एक मालवाहू वाहनाची (एम एच 27 बी एक्स 3203) झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधक गुटख्याचे एकूण 16 पोते ज्याची किंमत बाजारात अंदाजे 10 लाख रुपये आहे. तसेच चार चाकी मालवाहन पकडून मुर्तीजापूर शहर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या प्रकरणी विशाल राजेश घोरसडे यास अटक करण्यात आली.
प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री जोरात -
राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा अवैधरित्या मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. सरार्सपणे प्रतिबंधित गुटखा पानटपरीवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सतत कारवाई होत नसल्याने प्रतिबंधित गुटखा सर्रास विकला जात आहे.