ETV Bharat / state

शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे, आमदार सावरकरांनी कृषी अधिकाऱ्यांना केल्या सूचना - आमदार रणधीर सावरकर यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सुचना

शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावे, यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांच्या निवासस्थानी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या.

आमदार रणधीर सावरकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
author img

By

Published : Oct 27, 2019, 12:26 PM IST

अकोला - जिल्ह्यात परतीचा पाऊस सर्वदूर पडत आहे. कापणीला आलेले पीक खराब होत आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोंब आले आहेत. कापूसही आता वेचणी योग्य नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावे, यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या.

शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी मार्गदर्शन करण्याबाबत आमदार सावरकरांनी कृषी अधिकाऱ्यांनी केल्या सूचना

हेही वाचा... विजयाच्या जल्लोषात न रमता आमदार धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पावसामुळे ओलाचिंब झाले आहे. त्याच्या शेंगाना कोंब आले आहेत. बार्शी टाकळी तालुक्यातील अनेक गावातील शेतामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यासोबतच कापूसही ओलाचिंब झाला आहे. काही दिवसातच तोडणीला येणारा कापूस, त्याचे बोंड ओले झाल्यामुळे गळून पडण्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तोंडचा घास पळविल्यासारखी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. अति पावसामुळे शेती पण खराब झाली असून ती खरडून निघत आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचले असल्यामुळे उभे पीक खराब झाले आहे. तर काही शेतात पीक पूर्णपणे नेस्तनाबूत झाले असून शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत वावरत आहे. ऐन दिवाळीच्या आधी हा प्रकार घडल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी पण आता पैसे नसल्याची स्थिती आहे. परिणामी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या खराब झालेल्या तसेच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवावा, यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

हेही वाचा... आमदार राजेश एकडेंकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजारांची आर्थिक मदत देण्याची मागणी

अकोला पूर्व या मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार रणधीर सावरकर यांनी पावसाचा व शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचा अंदाज घेत कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आपल्या निवासस्थानी बोलावून एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तयार करून कृषी आयुक्तांना पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच कापसाचे बोंड काळे पडले असून शेतकऱ्यांना फावरणीबाबत मार्गदर्शन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

Intro:अकोला - परतीचा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर पडत आहे. कापणीला आलेले पीक खराब होत आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोम आले असून कापूसही आता वेचणी योग्य नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावे, यासाठी आमदार रणधीत सावरकर यांनी आज त्यांच्या निवासस्थानी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्यात.
Body:परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पावसामुळे ओलाचिंब झाले असून त्याच्या शेंगाना कोंब आले आहेत. बार्शीटाकळी तालुक्यातील अनेक गावातील शेतामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यासोबतच कापूसही ओलाचिंब झाला आहे. काही दिवसातच तोडणीला येणारा कापूस त्याचे बोंड ओले झाल्यामुळे कापूस गळून पडण्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तोंडचा घास पळविल्या सारखी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. अति पावसामुळे शेती पण खराब झाली असून ती खरडून निघत आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचले असल्यामुळे उभे पीक खराब झाले आहे. तर काही शेतात पीक पूर्णपणे नेस्तनाबूत झाले असून शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत वावरत आहे. ऐन दिवाळीच्या आधी हा प्रकार घडल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी पण आता पैसे नसल्याची स्थिती आहे. परिणामी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या खराब झालेल्या तसेच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवावा, यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांनी आधी अकोला पूर्व या मतदारसंघातून निवडून आलेले आमदार रणधीर सावरकर यांनी पावसाचा व शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचा अंदाज घेत कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आपल्या निवासस्थानी बोलावून एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तयार करून कृषी आयुक्तांना पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच कापसाचे बोड काळे पडले असून शेतकऱ्यांना फावरणीबाबत मार्गदर्शन करण्याचे ही त्यांनी सांगितले. अचारसहिता असतानाही आमदार रणधीर सावरकर यांनी कुठलीही तमा न बाळगता शेतकऱ्यांप्रति जागरूक राहून त्यांना न्याय देण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला आहे.

बाईट - युवा शेतकरी
सारकीन्ही, तालुका बार्शीटाकळी

बाईट - आमदार रणधीर सावरकरConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.