ETV Bharat / state

कापूस खरेदी सुरू करा; आमदार देशमुख यांनी घेतली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक

author img

By

Published : Apr 28, 2020, 7:39 PM IST

बैठकीत भारतीय कापूस निगम (सी.सी.आय.)चे विभागीय व्यवस्थापक अजयकुमार व जिल्हा निबंधक डॉ. प्रवीण लोखंडे हे उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये मान्य असलेले सर्व कापूस खरेदी केंद्र दोन दिवसाच्याआत सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अकोला तालुका चिखलगाव, निंबी, आपातापा, बाळापुर, पारस, अकोट, तेल्हारा हिवरखेड, मूर्तिजापूर येथे असे एकूण १३ सीसीआयचे केंद्र आहेत.

cotton buying start  mla nitin deshmukh  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी  आमदार नितीन देशमुख
आमदार देशमुख यांनी घेतली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक

अकोला - कापूस खरेदी सुरू करण्यात यावी यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. यामध्ये कापूस खरेदी केंद्रांपैकी किती केंद्र सुरू झाले? आणि जे बंद आहेत ते का सुरू झाले नाही? यावर चर्चा करण्यात आली. तसेच त्यांनी खासदार अरविंद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्यासोबत बोलून निर्णय घेण्यात येईल, असे खासदार सावंत म्हणाल्याचे देशमुख यांनी सांगितले.

बैठकीत भारतीय कापूस निगम (सी.सी.आय.)चे विभागीय व्यवस्थापक अजयकुमार व जिल्हा निबंधक डॉ. प्रवीण लोखंडे हे उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये मान्य असलेले सर्व कापूस खरेदी केंद्र दोन दिवसाच्याआत सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अकोला तालुका चिखलगाव, निंबी, आपातापा, बाळापुर, पारस, अकोट, तेल्हारा हिवरखेड, मूर्तिजापूर येथे असे एकूण १३ सीसीआयचे केंद्र आहेत. पैकी मूर्तिजापूर वगळून १२ केंद्र दोन दिवसांत सुरू होतील. सद्यस्थितीत फक्त दोनच केंद्र सुरू असल्याचे चर्चेत निष्पन्न झाले. शेतकऱ्यांचा सर्व प्रकारचा कापूस एकाच ग्रेडमध्ये खरेदी करण्यात यावा, असेही आमदार देशमुख म्हणाले.

दरम्यान, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्याशी तातडीने चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सावंत म्हणाले, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

डीडीआर लोखंडे यांनी महाराष्ट्र कापूस पणन महासंघाचे केंद्र सुद्धा तातडीने सुरू कररण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हा प्रमुख तथा जि.प. सदस्य गोपाल दातकर, तालुका प्रमुख विकास पागृत, जिल्हा परिषद सदस्य अप्पुूतिडके यांच्यासह आदी उपस्थीत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.