अकोला - कोरोना रुग्णांची वाढती संख्या यामुळे व्यापाऱ्यांनी आजपासून पाच दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, या बंदला पहिल्या दिवशीच संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा बंद चार दिवस राहील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या बंदच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेतली असून नागरिकांनी व्यापाऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते.
व्यापाऱ्यांचा बंद असला तरीही खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. तर अनेक व्यापारी हे दुकानाचे शटर बंद करुन कामगारांसोबत दुकानाच्या बाहेर उभे आहेत. परिणामी व्यापार्यांचा बंद खरंच यशस्वी होईल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.