ETV Bharat / state

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात वाद किंवा राजकारणाची गरज नाही - माणिकराव ठाकरे - Manikrao Thackeray in akola

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या राजकारण सुरू आहे. यासंदर्भात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना विचारणा केली.

माणिकराव ठाकरे
माणिकराव ठाकरे
author img

By

Published : Jan 5, 2021, 5:58 PM IST

अकोला - औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या राजकारण सुरू आहे. यासंदर्भात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी यासंदर्भात वाद किंवा राजकारण करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानूसार विकासात्मक कामे करणे आवश्यक असल्याचे माणिकराव ठाकरे म्हणाले. अकोला येथून किसान विकास मंचतर्फे दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमत ते आले होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली.

माणिकराव ठाकरे

विकास महत्त्वाचा, नाव बदलणे नाही-

माणिकराव ठाकरे म्हणाले, औरंगाबाद शहराच्या नामांतराचा वाद आहे, असे मला वाटत नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाप्रमाणे विकासाची कामे झाली पाहिजेत. त्यामुळे जो विषयच नाही त्यावर राजकारण करण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यामध्ये कोणाच्याही नाराजीचा प्रश्न नाही. ज्यावेळी हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यावेळी न्यायालयाने म्हटले की, विकास महत्त्वाचा आहे, नाव बदलणे महत्त्वाचे नाही. नाव बदलण्याचे राजकारण किंवा त्याला बळ देण्याचा प्रकार कोणी करायला नको, असे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले.

त्यावेळी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली-

तसेच राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्व बदलासंदर्भात त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आहेत. पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील त्यावर आम्ही काम करू. सध्या ते राज्याचे नेतृत्व करीत आहे. हे आम्हाला मान्य आहे. मला संधी मिळेल किंवा नाही हे माहीत नाही. परंतु, मला जेव्हा संधी मिळाली होती. त्यावेळी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली आहे. पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील तो योग्य राहील, असेही काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा- पुढील आठवड्यात होऊ शकते कोरोना लसीकरणाला सुरुवात; आरोग्य सचिवांचे संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.