ETV Bharat / state

तेल्हारा शहरात एकाची जाळून हत्या; घराजवळच आढळला मृतदेह

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात ५० वर्षीय व्यक्तीची जाळून हत्या... शनिवारी बेपत्ता झाल्यानंतर आज सकाळी मृताच्या घराजवळच आढळला मृतदेह... रमेश ओंकार हागे असे आहे मृताचे नाव

एकाची जाळून हत्या
author img

By

Published : Mar 10, 2019, 1:01 PM IST

अकोला - तेल्हारा शहरातील ५० वर्षीय व्यक्तीला आज सकाळी जाळून घरासमोर फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रमेश ओंकार हागे, असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमागील कारण कळू शकले नाही.

एकाची जाळून हत्या

तेल्हाराच्या संभाजी चौकात राहणारे रमेश ओंकार हागे हे रविवारी मजुरीकरीता शेतामध्ये गेले होते. मात्र, रात्रीपर्यंत ते घरी आले नसल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर आज पहाटे रमेश हागे यांचा जळालेल्या अवस्थेतेतील मृतदेह त्यांच्या घराजवळच आढळून आला. अत्यंत क्रूरपणे हागे यांची हत्या करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून पुढील तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या हत्येमागील नेमके कारण अस्पष्ट आहे. ही घटना बिहार राज्यासारखीच असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. रमेश हागे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. रमेश हागे यांच्याकडे दोन एकर शेती असून त्या शेतीच्या वरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

Intro:अकोला - तेल्हारा शहरातील 50 वर्षीय व्यक्तीला आज सकाळी जाळून घरासमोर फेकून देण्याची घटना घडली. या विदारक घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून ही घटना अंगावर शहारे आणणारी ठरली. रमेश ओंकार हागे असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमागील कारण कळू शकले नाही.

Body:संभाजी चौकात राहणारे रमेश ओंकार हागे हे रविवारी मजुरी करता बाहेर शेतामध्ये गेले होते. मात्र, रात्रीपर्यंत ते घरी आले नसल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. आज पहाटे रमेश हागे हे त्यांच्या घरासमोर जळालेल्या अवस्थेत व मृत अवस्थेत मिळून आले. क्रूरतेने झालेली घटना तेल्हारा वासियांसाठी अंगावर शहारे आणणारी ठरली आहे. घटनास्थळावर तेल्हारा पोलीस पोहोचले असून या घटनेची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना बिहार राज्यासारखीच असल्याची चर्चा आहे. या घटनेने तेल्हारावासीयांची सकाळ रक्तरंजित केली आहे. रमेश हागे यांना मारणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत असून वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत..
रमेश हागे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. रमेश हागे यांच्याकडे दोन एकर शेती असून त्या शेतीच्या वरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

Conclusion:सुचना - व्हिडीओ मेल केले आहे....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.