अकोला - गणपती विसर्जन करण्सासाठी एमआयडीसी 4 मधील शिवणी अकोला येथील खदानीत गेलेला युवक चंदन मोरे हा बुडाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती. त्यांनी यााबबत संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला माहिती देताच, बचाव पथकाने शुक्रवारी चंदनचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि दुपारी त्याचा मृतदेह काढण्यात पथकाला यश आले.
गुरुवारी एमआयडीसी क्रमांक 4 मधील शिवणी अकोला येथील खदानीत गणेश विसर्जन करतांना चंदन मोरे हा बुडाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. त्यावर बचाव पथकाचे विकी साटोटे, राहुल जवके, मनोज कासोद, मयुर कळसकार, मयुर सळेदार, गोकुळ तायडे यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी शिवणी येथील श्रीराम वाहुरवाघ,गौतम गवई, पप्पु ठाकुर, गणेश मुंडे, यांनी आधीच खदानीत पाहने सुरू केले होते. यापैकी श्रीराम वाहुरवाघ यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना चेतनच्या मृतदेहाला पाय लागल्याचे सांगितले. यावेळी दीपक सदाफळे यांनी श्रीराम वाहुरवाघ आणि गौतम गवई यांना लोकेशननुसार समोर पाठवले आणि पाण्यात उडी घेऊन अंडर डाऊन अप करुन मृतदेह बाहेर काढला. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि महसूलचे तलाठी देशमुख हजर होते.
हेही वाचा - गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेला युवक खदानीत बुडाला