ETV Bharat / state

महाशिवरात्री : गोपालखेडच्या स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - mahashivratri news akola

महाशिवरात्रीनिमित्त गोपालखेड येथील पूर्णा नदीवर असलेल्या स्वयंभू महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली. जमिनीच्या १०० फूट खोल असलेल्या स्वयंभू महादेवाला महाशिवरात्रीआधी ग्रामस्थ माती उत्खनन करून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करतात.

स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

author img

By

Published : Feb 21, 2020, 8:18 PM IST

अकोला - महाशिवरात्रीनिमित्त गोपालखेड येथील पूर्णा नदीवर असलेल्या स्वयंभू महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली. भूसपाटीपासून १०० फूट खोल भूगर्भात असलेल्या स्वयंभू महादेवाला महाशिवरात्रीआधी ग्रामस्थ मातीचे उत्खनन करून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करतात.

स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पानेट या गावाजवळील पूर्णा नदीच्या पायथ्याशी असलेल्या 'श्री मारुती व ब्रह्मचारी महाराज संस्थान'च्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त हे शिवकार्य केल्या जाते. गोपालखेड येथील ग्रामस्थ महाशिवरात्रीच्या १५ दिवसांमध्ये या पिंडीचे दर्शन व्हावे म्हणून माती उत्खनन करतात. त्यासोबतच ब्रह्मचारी महाराजांच्या मंदिरातील गाळ काढून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करतात. महाशिवरात्रीच्या ७ दिवसांआधी येथे सप्ताह आयोजित करण्यात येतो. या सप्ताहाला गोपालखेड गावातील व आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

हेही वाचा - अकोल्यात प्लंबरची धारदार शस्त्राने हत्या.. लोहिया कंपाऊंडमधील घटना

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचे किर्तन करून या सप्ताहाचा समारोप होतो. हे मंदिर १२५ वर्षांपेक्षा जास्त जुने असल्याचे सांगण्यात येते. ब्रह्मचारी महाराजांना येथे महादेवाच्या पिंडीचा साक्षात्कार झाला होता. येथे महादेवाच्या १२ पिंडी असून विविध कपारींमध्ये या पिंडी असल्याचे बोलले जाते. ब्रह्मचारी महाराज, गजानन महाराज, नरसिंह महाराज हे समकालीन असून येथे भेटत असल्याचेही बोलले जाते. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा इतिहासही या पिढीला असल्याचे समजते.

हेही वाचा - बॉक्सिंगपटू प्रणव राऊतची गळफास घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.