अकोला - उड्डाणपुलाच्या संदर्भात चुकीच्या डीपीआर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही विश्वासात न घेता तयार केला असल्याचा आरोप आळशी प्लॉट उड्डाणपूल विरोधी कृती समितीने केला. याचा विरोध म्हणून राष्ट्रीय महामार्ग येथे सुरू असलेल्या निर्माधीन कामाजवळच नागरिकांनी आज धरणे आंदोलन केले. प्रस्तुत निर्माण कार्य थांबवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
काय आहे प्रकरण -
आळशी प्लॉट येथील हुतात्मा चौक ते दक्षता नगर पर्यंत जाणाऱ्या जुन्या मिनी बायपासवरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दक्षता नगर ते एनसीसी कार्यालय दरम्यान उड्डाणपूल तयार होत असून यात नागपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भागात एक रॅम तर दुसरा रॅम बाळापुरकडे जाणारा उड्डाणपुलावर बांधला जात आहे. याचे काम बांधकाम नकाशाप्रमाणे झाले नाही. दोन्हीकडील रॅमची जागा कमी केल्यामुळे कमी जागेत उड्डाणपूल होऊ शकत नाही. या कमी जागेमुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांची नवी डोकेदुखी वाढणार आहे.
हेही वाचा - 'लॉकडाऊन हा पर्याय नाही; पण, प्रशासनाला वाटत असेल तर विरोध नाही'