अकोला - मराठा समाजाचे प्रश्न हे एका तासात निकाली लागु शकतात दोन दिवसांचे अधिवेशन आहे. मात्र, आम्हाला चर्चा नको डीबेट नको त्यामुळे पर्याय शोधा, असे वक्तव्य संभाजी महाराज यांनी आज अकोला येथील संवाद बैठकीत केले.
रामदास पेठ पोलीस स्टेशनजवळ असलेल्या मराठा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, त्यांना त्यांच्या पक्ष स्थापनेबद्दल विचारले असता त्यांनी मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असून मला पद भोगू द्या. ते म्हणाले माझा जन्म शिवाजी महाराजांच्या वंशात झाला आहे. कोण काय बोलतेय त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी कोणाला फसवणार सुद्धा नाही. अनेक जण शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर टीका करत होते. टीका करणारे करतात, असेही संभाजी महाराज म्हणाले.
प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती मी तुमच्याकडे सेवक म्हणून आलो आहे. मला महाराज म्हणून नका. मी शाहू महाराजांचा वंशज आहे. खामगाव येथे शाहू महाराज यांची सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी सेवक असे म्हणा, शेतकरी म्हणा, असे म्हटले होते. तुम्ही पण मला सेवक म्हणा, असे ते म्हणाले. 342 (अ) कलम बाबतीत ते म्हणाले, आम्हाला ओबीसीत जायचे नाही. मागासवर्गीय आयोग निर्माण झाला पाहिजे. भोसले समिती आणि गायकवाड समितीमधील त्रुटी दूर करून मराठयांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच यासाठी राज्यपाल यांनी राष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठवून तो जर राष्ट्रपती यांनी मंजूर केला तर केंद्र सरकारने यासाठी दुरुस्ती करून आरक्षण दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी खामगाव येथील रद्द झालेल्या कार्यक्रमाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. खामगाव येथील कार्यक्रम हा छोटेखानी होता. मात्र, तिथे मोठा लमाजमा दिसला. कोरोनासारखी महामारी वाढू नये, यासाठी ही लढाई आता एकत्र येवून नाही तर ती डोक्याने लढवावी लागणार असल्याचेही संभाजी महाराज म्हणाले.