ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : विद्यार्थ्यांसाठी ‘खंडाळा रेडिओ वाहिनी'.. उपक्रमशिल शिक्षकाचा अभिनव उपक्रम

सध्या कोरोनामुळे सर्वत्र शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तसेच आगामी काळातही लवकर शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता खंडाळा जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुलसीदास खिरोडकार रेडिओ खंडाळा वाहिनी सुरू केली आहे.

launched-radio-khandala-channel-for-student-education-in-akola
विद्यार्थ्यांसाठी ‘खंडाळा रेडिओ वाहिनी'.
author img

By

Published : Jun 11, 2020, 12:27 PM IST

Updated : Jun 25, 2020, 7:24 PM IST

अकोला- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. मात्र, शाळा बंद असल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड जवळील खंडाळा जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुलसीदास खिरोडकार यांनी 'रेडिओ खंडाळा' वाहिनी सुरू केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांसाठी ‘खंडाळा रेडिओ वाहिनी'.

विद्यार्थांसाठी रेडिओ खंडाळा वाहिनी...

सध्या कोरोनामुळे सर्वत्र शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तसेच आगामी काळातही लवकर शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता खंडाळा जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुलसीदास खिरोडकार रेडिओ खंडाळा वाहिनी सुरू केली आहे. याद्वारे विद्यार्थांना शिक्षणाचे धडे दिले जातात. विद्यार्थांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना काळात आ‌ॅनलाईन शिक्षणावर भर...

कोरोनामुळे शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे केंद्र सरकारने ई-बूक तसेच वर्गनिहाय वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य शासनाच्यावतीने आ‌ॅनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शाळांसोबतच शिक्षकही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. खंडाळा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तुलसीदास खिरोडकार यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळातही शिक्षण देण्याकरिता रेडिओ वाहिनीचा वापर सुरू केला आहे.

पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थी घेतायेत शिक्षण....

विद्यार्थांसाठी सुरू केलेल्या या वाहिनीला 'रेडिओ खंडाळा' असे नाव देण्यात आले असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात केली आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार मोबाईलवर लिंक पाठविण्यात येत असून राज्यभर त्या लिंक प्रसारित करण्यात येत आहेत. ती लिंक ओपन केल्यावर विद्यार्थ्यांना दररोजचा अभ्यासक्रमासोबतच बोधकथा, पाठ्यपुस्तकातील कविता गायन, उतारा वाचन ऐकविण्यात येतो.

आरोग्यविषयक सवयीचेही शिक्षण...

विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्याकरिता कोणता व्यायाम करावा, याचीही माहिती वाहिनीद्वारे विद्यार्थांना देण्यात येत आहे. आरोग्यविषयक सवयी, शैक्षणिक विचारांवर चर्चा, भाषिक संबोधन, गणित, विज्ञान या विषयावर विविध क्षेत्रातील अभ्यासक या वाहिनीवर येऊन विद्यार्थांना शिक्षणाचे धडे देत आहेत. पुस्तकातील पाठ, कविता, संगीतमय पाढे सादरिकरण करण्यात येत आहेत. शिक्षकांच्यावतीने ही लिंक विद्यार्थ्यांच्या किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या मोबाईलवर पाठवण्यात येत आहे.

Last Updated : Jun 25, 2020, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.