अकोला - शहरातील रोशनी हर्बल ब्युटी पार्लरच्या संचालिका ज्योती विंचनकार यांनी एका तासात १०७ आयब्रो करण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्यांच्या या विश्वविक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे अकोल्याची मान उंचावली गेली आहे.
शहरातील डाबकी रोडवरील देशमुख मंगल कार्यालयात रोशनी हर्बल ब्युटी पार्लरचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. ज्योती विंचनकर यांनी यानिमित्त एका तासात १०० पेक्षा जास्त आयब्रो करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला. या संस्थेचे अलोक कुमार हे यावेळी उपस्थित होते. त्यांच्या समक्ष हा विक्रम पूर्ण करण्यात आला. ज्योती यांनी एका तासात तब्बल १०७ आयब्रो पूर्ण केल्या. त्यांच्या या कामगिरीसाठी अलोक कुमार यांनी त्यांना विश्वविक्रमाचे प्रशस्तीपत्र दिले. यावेळी त्यांचे सर्वांनी कौतुक केले.
आधीचा विश्वविक्रम मोडला -
याआधी अमेरिकेतील हिना खान यांनी हा विश्वविक्रम केला होता. त्यांनी एका तासात ५७ आयब्रो केले होते. या विश्वविक्रमाला गवसणी घालत ज्योती विंचनकर यांनी एका तासात १०७ आयब्रो करून आधीचा विक्रम मोडला.