अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वार्डमध्ये कार्यरत असलेल्या आंतरवासिता डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन करीत अधिष्ठाता यांच्या कक्षात समोर ठिय्या देऊन नारेबाजी केली. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी या आंतरवासिता डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.
कोरोना महामारीचा प्रचंड प्रकोप उभा झाला आहे. त्या अनुषंगाने 2016 वर्षाची बॅच आंतरवासिता डॉक्टर या महामारीमध्ये तसेच कोविड वॉर्डमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत. फ्रंट लाईन वर्कर म्हणून ते सहकार्य करीत आहेत. मागील वर्षापेक्षा ही कोविडची दुसरी लाट ही भयानक आहे. त्याबद्दल शंका नाही. आंतरवासिता डॉक्टर केवळ 360 रुपये प्रतिदिन व त्यामध्ये आपल्या जीवाची परवाह न करता या महामारीत सामना कोरोना रुग्ण सेवा व त्यामार्फत राष्ट्र सेवा करीत आहे.
जीएमसीतील आंतरवासिता डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; कोविड वार्डातील रुग्णसेवेवर परिणाम - अकोला कोरोना न्यूज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वार्डमध्ये कार्यरत असलेल्या आंतरवासिता डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन करीत अधिष्ठाता यांच्या कक्षात समोर ठिय्या देऊन नारेबाजी केली.