ETV Bharat / state

खुशखबर! ज्येष्ठ नागरिकांचा बँक व्यवहार सांभाळणार पोस्टमन; दहा हजारापर्यंत पैसे काढण्याची मुभा - भारतीय डाक सुविधा बातमी

लॉकडाऊनमुळे बँक व्यवहार करण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. ज्येष्ठ नागरिक मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय.

indian post
पोस्ट कार्यालयाच्या हेल्पलाईन क्रमाकांवर संपर्क साधल्यास पोस्टमन थेट घरपोच पैसे पोहोचवणार आहे.
author img

By

Published : Apr 3, 2020, 4:49 PM IST

अकोला - लॉकडाऊनमुळे बँक व्यवहार करण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. ज्येष्ठ नागरिक मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतयं. मात्र आता ज्येष्ठ नागरिकांसाठी डाक विभागामार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. पोस्ट कार्यालयाच्या हेल्पलाईन क्रमाकांवर संपर्क साधल्यास पोस्टमन थेट घरपोच पैसे पोहोचवणार आहे. या सेवेत नागरिकांना दहा हजारांपर्यंत पैसे काढण्याची मुभा आहे.

संबंधित सेवा डाक कार्यालयातील ग्राहकांसोबतच अन्य सर्व बॅंकांना उपलब्ध असल्याने ज्येष्ठांना याचा फायदा होणार आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांना जीवनावश्यक गोष्टींंसाठी कसरत करावी लागत आहे. तसेच अनेकांना पैशाचीदेखील चणचण भासत आहे. ज्येष्ठ नगरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जाव लागतंय. यासाठी डाक कार्यालयातर्फे अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाती असलेल्या खातेधारकांना दहा हजारांपर्यंत पैसे काढता येणार असल्याचे टपाल विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच या कालावधीत संबंधित ग्राहकांना टपाल खात्याचीही विविध सेवा आणि किराणामाल आणून देण्याची सेवादेखील पुरवण्यात येणार आहे. या सेवा अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत असतील, असे प्रवर अधीक्षक यांनी सांगितले आहे. यासाठी त्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाऱ्या व्यक्तींनी प्रवर अधीक्षक अकोला विभाग अकोला यांच्या दूरध्वनी क्रमांकावर 0724 - 2415039 वर सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.