ETV Bharat / state

अकोल्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालय कोरोना काळातही बंदच

जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. चारही इमारतींपैकी अकोल्यातील इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे ही इमारत कोरोना महामारीच्या काळात पांढरा हत्ती ठरत असल्याची चर्चा होत आहे.

सुुुुपरस्पेशालीटी
सुुुुपरस्पेशालीटी
author img

By

Published : Apr 18, 2021, 4:17 PM IST

Updated : Apr 18, 2021, 4:36 PM IST

अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी बेड अपुरे पडत आहे. अशावेळी शहरात बांधण्यात आलेला सुपरस्पेशालिटी रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून आवश्यक साहित्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे येथे रुग्ण उपचार व्यवस्था अद्याप सुरू झालेली नाही. दरम्यान कोविड रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच या रुग्णालयाची पाहणी केली आहे. शिवाय संबंधित अधिकारी व डॉक्टरांसोबत चर्चा करत रुग्णालयाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

या वर्षी मिळाली मंजुरी

रुग्णांना योग्य दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यात चार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. त्याअंतर्गत हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. चारही इमारतींपैकी अकोल्यातील इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे ही इमारत कोरोना महामारीच्या काळात पांढरा हत्ती ठरत असल्याची चर्चा होत आहे.

अकोला सुपरस्पेशालिटी

इमारत शोभेची वास्तू ?

या रुग्णालयाच्या इमारतीला बांधून दोन वर्ष झाले आहे. परंतु, हे रुग्णालय अजूनही निर्मानाधीन आहे. या रुग्णालयात बेड, औषधांची व्यवस्था, आवश्यक लागणाऱ्या मशिन्स अजूनही उपलब्ध झाले नाही. तसेच मनुष्यबळही नाही. त्यामुळे ही इमारत सध्या शोभेची वास्तू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी हवेत इतकी पदे
सुपरस्पेशालिटी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी १ हजार २६ पदांना मंजुरीची आवश्यकता आहे. त्यात वर्ग-१ च्या ३५, वर्ग-२ च्या १४५, वर्ग-३च्या २७७, वर्ग-३ (प्रशासकीय) ७७, वर्ग-३ (तांत्रिक) १०९, वर्ग-४च्या ३८३ पदांचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भविष्यात ही संख्या अधिक वाढण्याची भीती आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी बेड व उपचार करण्यासाठी मनुष्यबळ, औषधांची गरज भासणार आहे. त्यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी केली.

हेही वाचा-दिलासादायक! औरंगाबादच्या चार रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प सुरू

Last Updated : Apr 18, 2021, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.