अकोला: पातूर पोलीस ठाण्याच्या Patur Police Station हद्दीतील शेकापूर (राम नगर) मध्ये एका दारुड्या पतीने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून Akola Crime निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोपीचंद राजाराम चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. तर संगीता गोपीचंद चव्हाण असे हत्या झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
आरोपी गोपीचंद आणि संगीताचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाला होता. काही दिवस संसार सुरळीतपणे सुरू असतांना गोपीचंदला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे दोघांच्यामध्ये वाद होत असतं. नेहमी दारू पिऊन गोपीचंद हा संगीताला मारहाण करत, तिच्यावर संशय घेत असल्याने तिने पातूर पोलीस ठाण्यात गोपीचंद विरोधात 3 वेळा तक्रारीसुद्धा दिली होती. परंतु पातूर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. शेवटी संगीताचे गावातच माहेर असल्याने ती आपल्या अर्जुन आणि अंशुमन या 2 मुलांसह माहेरी राहत होती.
क्रूरपणे हत्या केली तडजोडी अंती ती गोपीचंदसोबत नांदायला आली होती. शेवटी 12 ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. रात्री झोपी गेल्यावर गोपीचंद पहाटे झोपेतून उठला आणि कुऱ्हाडीने संगीताच्या डोक्यात, मानेवर आणि पायावर घाव घालून संगीताची क्रूरपणे हत्या केली आहे. पातूर पोलिसांनी संगीताचे वडील रामचंद्र देवा राठोड यांच्या तक्रारीवरून खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आली आहे.
पत्नीने केली होती 3 वेळा पोलिस तक्रार गोपीचंदला दारूचे व्यसन होते. त्यासोबतच पत्नीवर संशय घेत होता. या सर्व कारणावरून त्या दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे. यादरम्यान गोपीचंद हा पत्नीला मारत ही होता. या त्रासाला कंटाळून पत्नी संगीताने पतीविरोधात पातूर पोलिस ठाण्यात 3 वेळा तक्रार केली होती.