अकोला - एसटी कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते, वकील जयश्री पाटील, अजय गुजर आणि प्रफुल गांवडे यांच्यावर अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आता अकोट न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांना जामीन मंजूर केला ( Gunratna Sadavarte Grant Bail Akot court ) आहे.
एसटी कर्मचाऱ्यांकडून 300 आणि 500 रुपये गोळा करुन 74 हजार 400 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते, वकील जयश्री पाटील, अजय गुजर आणि प्रफुल गांवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या चार आरोपींपैकी अजय गुजर आणि प्रफुल गावंडे यांना अटक करण्यात आली आहे. तर, गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील आणि जामीनासाठी अर्ज केला होता. त्याप्रकरणी अकोट न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर झाला आहे.
सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणातही जामीन - सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना 50 हजारांच्या जातमुचकल्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, या प्रकरणातील सर्व 115 जणांनांही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा - Rana VS Shivsena : मातोश्रीवर उद्या 9 वाजता हनुमान चालीसाचे पठण करणारच; रवी राणांचा निर्धार