ETV Bharat / state

नरनाळा किल्ल्याचा विकास करणार - पालकमंत्री बच्चू कडू - नरनाळा किल्ला

शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शहापूर येथील नरनाळा किल्ल्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी संबंधितांनी सूचना दिल्या.

किल्ल्याची पाहणी करताना राज्यमंत्री बच्चू कडू

author img

By

Published : Feb 3, 2020, 11:39 AM IST

अकोला - पर्यटनाला चालना देण्यासाठी नरनाळा किल्ल्यासह परिसराचा विकास करून ग्राम पर्यटन संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण व कामगार कल्याण राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले.

नरनाळा किल्ल्याला राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट

अकोट तालुक्यातील शहापूर येथील वनविभागाच्या विश्राम गृहात नरनाळा किल्ल्याचा पर्यटन विकास करण्यासाठी आढावा बैठक आयोजीत केली होती. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी पालकमंत्री बच्चू कडू यांनी नरनाळा किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी महाकाली व्दारच्या विकासासाठी सूचना संबंधितांना दिल्या. शक्कर तलाव येथे भेट देऊन या तलावात पायडल नौकाद्वारा नौका विहार करणे शक्य आहे का? याबाबत शहानिशा करावी तसेच तलावातील पाण्याचा उपयोग करून सौरउर्जेचा वापर करून कृत्रिमरीत्या धबधबा तयार करण्याबाबत सूचना दिल्या.

हेही वाचा - अकोल्यात विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा मोर्चा

तसेच नौगज तोफ व राणीमहल येथे सुद्धा पालकमंत्री यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अकोट येथील उपवन संरक्षक (वन्यजीव) टी. बेऊला, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे, पुरातत्व विभागाचे संरक्षक सहाय्यक संतोष महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, उपविभागीय अधिकारी अकोट रामदास सिद्धभट्टी, उपवन संरक्षक अकोला विभाग विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

अमरावती जिल्ह्यातील गावीडगड किल्ला व नरनाळा किल्ला असा मार्ग तयार करण्यात यावा जेणे करून शेंगाव येथील धार्मिक स्थळाला भेट दिल्यानंतर पर्यटक नरनाळा किल्ल्याला भेट देऊन चिखलदरा येथे जाऊ शकेल. यासाठी नरनाळा किल्ला विकास कार्यक्रमासह वनविभाग, पर्यटनविभाग, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभाग यांनी संयुक्तरित्या अंदाजपत्रक 7 दिवसांच्या आत तयार करावे, असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले. शहानूर गाव पालकमंत्री दत्तक ग्राम योजनेत दत्तक घेण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले. शहानूर आदिवासी ग्रामस्थांशी चर्चा केली.

हेही वाचा - पदग्रहण समारंभासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्षा आल्या पारंपरिक वेशात

Intro:अकोला - पर्यटनाला चालना देण्यासाठी नरनाळा किल्ल्यासह परिसराचा विकास करून ग्राम पर्यटन संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास, शालेय शिक्षण व कामगार कल्याण राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज केले.Body:अकोट तालुक्यातील शहापुर येथील  वनविभागाच्या विश्राम गृहात नरनाळा किल्ल्याचा  पर्यटन विकास करण्यासाठी आढावा बैठक आयोजीत केली होती. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी पालकमंत्री बच्चू कडू यांनी नरनाळा किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सर्वप्रथम महाकालीव्दारला भेट दिली. व  महाकाली व्दारच्या  विकासासाठी  सुचना संबंधीताना दिल्यात. शक्कर तलाव येथे भेट देऊन या तलावात पायडल नौकाद्वारा नौका विहार करणे  शक्य आहे का याबाबत  शहानिशा करावी तसेच  तलावातील पाण्याचा उपयोग करून सौरउर्जेचा वापर करून कृत्रिमरीत्या धबधबा तयार करण्याबाबत सुचना केल्यात. तसेच नौगज  तोफ  व राणीमहल  येथे सुद्धा  पालकमंत्री  यांनी भेट दिली. यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अकोट येथील उपवन संरक्षक (वन्यजीव) टी. बेऊला, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे,  पुरातत्व विभागाचे संरक्षक सहाय्यक संतोष महाजन ,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता  गिरीश जोशी, उपविभागीय अधिकारी अकोट रामदास सिद्धभट्टी, उपवन संरक्षक अकोला विभाग विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
अमरावती जिल्ह्यातील गावीडगड किल्ला व नरनाळा किल्ला असा मार्ग तयार करण्यात यावा जेणे करून  शेंगाव  येथील धार्मिक स्थळाला भेट दिल्यानंतर  पर्यटक नरनाळा  किल्ल्याला भेट देऊन चिखलदरा येथे जाऊ शकेल. यासाठी नरनाळा किल्ला  विकास कार्यक्रमसह  वनविभाग , पर्यटनविभाग , पुरातत्व विभाग ,  सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभाग यांनी संयुक्तरित्या  अंदाजपत्रक सात दिवसाच्या आत  तयार करावे असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिलेत. शहानूर गाव पालकमंत्री  दत्तक ग्राम योजनेत  दत्तक घेण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले. शहानूर आदिवासी ग्रामस्थांशी चर्चा केली.

बाईट - पालकमंत्री बच्चू कडूConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.