अकोला - ग्रामीण भागात जळणासाठी लागणारे लाकूड व अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होतो. हा ऱ्हास होवू नये म्हणून, अकोल्यातील एका गोशाळेने पर्याय शोधला आहे. काय आहे नेमका हा पर्याय जाणून घेऊयात 'ईटीव्ही भारत'च्या विशेष वृत्तांतातून...
ग्रामीण भागात वापरल्या जाणारे जळन आणि हिंदू धर्मानुसार मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. यामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम झाला आहे. यावर उपाय म्हणून अकोल्यातील मधूवत्सल गोशाळेने गायीच्या शेणापासून लाकडाच्या आकाराचे गोकाष्ट (गौऱ्या) तयार केल्या जात आहेत. या गोकाष्टचा उपयोग घरात जाळल्या जाणाऱ्या इंधनाच्या स्वरूपात केले जाऊ शकते.
अंत्यसंस्कारासाठी गोकाष्टच्या वापरामुळे थांबेल वृक्षतोड
कोरोना काळात मृतांची संख्या वाढत आहे. एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी एक झाड इतके लाकूड लागते. यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा म्हणून, गोशाळेतील गायीच्या शेणाचा उपयोग करून, या गोकाष्टची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामुळे लाकडाच्या ठिकाणी या गोकाष्टचा वापर झाल्याने, लाकडांचा वापर कमी होऊ शकेल. कोरोनाच्या या कठीण काळात याचा उपयोग प्रभावी ठरू शकेल. लाकडांशिवाय चितेची राख होऊ शकत नाही, असा समज काही लोकांचा आहे. त्यामुळे या गोकाष्टचा उपयोग सहसा टाळला जातो. त्यामुळे गोकाष्टचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी ठरला.
हेही वाचा - अकोला : 'या' गावात आजपर्यंत नाही एकही कोरोनाग्रस्त