ETV Bharat / state

विदर्भातील कन्या रोबोटिक्स स्पर्धेसाठी सज्ज - काजल इनोव्हेशन टेक्निकल सोल्युशन न्यूज

जानेवारीमध्ये मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत मनुताई कन्या शाळेतील विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. 'मनुताई किट्स एंजल' नावाने त्या विदर्भाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यासाठी मुलींना मागील दोन महिन्यांपासून रोबोटिक्सचे प्रशिक्षण दिले जात आहे.

'मनुताई किट्स एंजल'
'मनुताई किट्स एंजल'
author img

By

Published : Dec 19, 2019, 5:34 PM IST

अकोला - जानेवारीमध्ये मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत मनुताई कन्या शाळेतील विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. 'मनुताई किट्स एंजल' नावाने त्या विदर्भाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. शाळेतील मुलींना मागील दोन महिन्यांपासून रोबोटिक्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. सर्वसामान्य मुलींना पुस्तकी ज्ञानासोबतच रोबोटिक्स, विज्ञान-तंत्रज्ञान, इंग्लिश कम्युनिकेशन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प तयार करण्याचे ज्ञान मिळावे हा मागचा उद्देश आहे.

विदर्भातील कन्या रोबोटिक्स स्पर्धेसाठी सज्ज

मनुताई कन्या शाळा ही विदर्भातील सर्वात जुनी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा आहे. किट्स (काजल इनोव्हेशन टेक्निकल सोल्युशन) संस्थेच्या सामाजिक विभागाच्यावतीने राष्ट्रीय रोबोटिक्स तंत्रज्ञान स्पर्धेच्या 'फर्स्ट लिग्यु लीगच्या' निमित्ताने शाळेतील मुलींची तयारी सुरू आहे. मुली रोज रोबोटिक्सवर आधारित यंत्रणांशी एकरूप होऊन नवनवीन प्रयोग करत आहेत. या स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारी ही मुलींची पहिली बॅच असणार आहे.

हेही वाचा - "मोठा दिपस्तंभ मराठी रंगभूमीला पोरक करून गेला"

मनुताई कन्या शाळेतील माजी विद्यार्थिनी काजल राजवैद्य या आंतरराष्ट्रीय स्तरावर रोबोटिक्स प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रोबोटिक्स प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील प्रमुख समस्या कशा दूर करता येतील यासाठी 'सिटी शेपर' ही यावर्षीच्या स्पर्धेची थीम आहे. यासाठी सर्व मॉडेल्स विद्यार्थिनींनी तयार केले आहेत. यामध्ये शहरातील स्वच्छता, वाहतूक, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घरांचे स्थलांतर, रुफ वॉटर गार्डन यासारख्या विविध गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत.

Intro:अकोला - रोबोटिक्सचे शिक्षण ! आणि तेही अकोल्यात,आश्चर्य वाटतेय ना ? हो पण खरे आहे..सर्वसामान्य मुलींना पुस्तकी ज्ञानासोबतच रोबोटिक्स,विज्ञान-तंत्रज्ञान इंग्लिश कम्युनिकेशन आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प तयार करण्याचे ज्ञान मिळावे या उद्देशाने विदर्भातील सर्वात जुन्या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मनुताई कन्या शाळेमध्ये मागील दोन महिन्यापासून किट्स (काजल इनोव्हेशन टेक्निकल सोल्युशन) संस्थेच्या सामाजिक विभागाच्या वतीने राष्ट्रीय रोबोटिक्स तंत्रज्ञान स्पर्धेच्या 'फर्स्ट लिग्यु लीगच्या' निमित्ताने तयारी सुरू आहे. मुली रोज रोबोटिक्स आधारित यंत्रणांशी एकरूप होऊन नवनवीन प्रयोग करीत आहेत.आणि विशेष म्हणजे या स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारी ही मुलींची पहिली बॅच असणार आहे.
Body:मनुताई कन्या शाळेतिल माजी विद्यार्थिनी काजल राजवैद्य ह्या आज आंतरराष्ट्रीय स्तरावर रोबोटिक्समध्ये प्रशिक्षक म्हणून कार्य करीत आहे.आपल्या भागातील मुलींनी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवावा व त्यांच्याकडून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी या उद्देशाने काजल राजवैद्यने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विदर्भातील अकोल्याची शाळा निवडली त्यासाठी सर्व यंत्र उपलब्ध करून देण्याचे काम किट्स या संस्थेने केले. मुली रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रोबोटिक्सच्या ज्ञानासोबतच स्पर्धेच्या निमित्ताने हिंदी व इंग्रजी भाषेत पटापटा बोलायला लागली आहेत.त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे काम खऱ्या अर्थाने किट्स या संस्थेने केले आहे.

रोबोटिक्स प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील प्रमुख समस्या कशा दूर करता येतील याबत 'सिटी शेपर' ही यावर्षीची थीम असून याबाबतचे सर्व मॉडेल्स स्वतः विद्यार्थिनींनी काजल राजवैद्य यांच्या मार्गदर्शनात तयार केले असून यामध्ये शहरातील स्वच्छता, वाहतूक, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घरांचे स्थलांतर,रुफ वॉटर गार्डन यासह विविध गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातून शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी रोबोटिक्सचे ज्ञान प्रेरणा देणारे ठरत असून जानेवारीमध्ये मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थिनी 'मनुताई किट्स एंजल 'नावाने सहभागी होऊन विदर्भाचे प्रतिनिधित्व करीत प्रत्येक मुलींसाठी एक मोठा विचार मांडणार आहेत.
यासाठी किट्स संस्थेचे प्रशिक्षक विजय भट्टड, शर्वरी धारस्कर,अर्जुन देवरणकर,पल्लवी करमकर, वृषभ राजवैद्यसह अनेक संस्था एकत्रित येऊन कार्य करीत आहेत.
कायमच विज्ञान-तंत्रज्ञानापासून दूर असलेल्या व कधीही रोबोटिक्स न पाहलेल्या मुली आज राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी करीत असून यामुळे त्यांच्यामध्ये विज्ञाननिष्ठा,आत्मविश्वास व सहकार्याची भावना वाढीस लागत असून विदर्भातील मुलींची ही पहिली बॅच देशातील प्रत्येक मुलींसाठी प्रेरणा ठरेल हे निश्चित.

Byte -काजल राजवैद्य
किट्स, आंतरराष्ट्रीय संस्था
Byte-विद्यार्थीनी
Byte-मुख्याध्यापिकाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.