ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीला विकणाऱ्या टोळीला केले जेरबंद, जुने शहर पोलिसांची कारवाई - selling a minor girl

एका 14 वर्षाच्या मुलीला तीन जणांनी पेशवाईचे काम आहे, असे सांगत अकोला रेल्वे स्टेशनवर नेले. त्यानंतर तिला राजस्थानमध्ये नेऊन, तेथील रतन नावाच्या व्यक्ती सोबत तिचे लग्न लावून दिले. यासाठी या सर्वांनी रतनकडून दोन लाख रुपये घेतले.

gang of four arrested in akola for selling a minor girl
author img

By

Published : Aug 1, 2019, 12:09 PM IST

अकोला - जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ जुलै रोजी सायंकाळी एका 14 वर्षाच्या मुलीला तीन जणांनी पेशवाईचे काम आहे, असे सांगत अकोला रेल्वे स्थानकावर नेले. तिथे त्यांना विक्रमसिंग रतनलाल सिसोदीया व जायदाबी मोहम्मद हाशम भेटले. त्या सर्वांनी अल्पवयीन मुलीला राजस्थानमध्ये नेऊन तेथील रतन नावाच्या व्यक्तीसोबत तिचे लग्न लावून दिले. यासाठी या सर्वांनी रतनकडून दोन लाख रुपये घेतले.

अल्पवयीन मुलीला विकणाऱ्या टोळीला केले जेरबंद, जुने शहर पोलीसांची कारवाई

त्यानंतर, रतनने पत्नी म्हणून त्या अल्पवयीन मुलीशी जबरीने अत्याचार करत, तिने विरोध केला असता मारहाण करून चटकेही दिले. विशेष म्हणजे, तिला दोन लाख रुपयांना विकत घेतल्याचे रतनने स्वतः तिला सांगितले.

तत्पूर्वी, आपली अल्पवयीन मुलगी दिसत नसल्याचे पाहून तिच्या आईने जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलीचा शोध सुरू असताना, अल्पवयीन मुलीच्या मावशीला 24 जुलै रोजी रतन नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने तिला अल्पवयीन मुलीबाबत सांगितले. त्यानंतर मुलीची आई व इतर काही नातेवाईक हे राजस्थान येथे गेले आणि त्यांनी मुलीला घरी आणले.

त्यानंतर, त्यांनी ही माहिती जुने शहर पोलिसांना दिली. त्यावरून जुने शहर पोलिसांनी या घटनेचा तपास करीत यातील विक्की कदम, स्वप्निल गवई, प्रतिक बनकर आणि त्यांचा एक साथीदार अशा चार आरोपींना 12 तासांच्या आत अटक केली आहे. घटनेचा आणखी तपास जुने शहर पोलीस निरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत.

Intro:अकोला - एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला काम असल्याचे सांगून तिला राजस्थान येथील एका व्यक्तीशी विवाह लावून त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले. मुलीच्या मावशीला आलेल्या मोबाईल वरून वरून वरून वरून पोलिसांनी अल्पवयीन मुलीला विकणाऱ्या टोळीला जेरबंद केले. आंतरराज्य टोळीचा जुने शहर पोलिसांनी आज दुपारी पर्दाफाश केला. या घटनेमुळे परत शहरात अल्पवयीन मुलींना विकण्याची टोळी सक्रिय झाल्याचे उघडकीस आले आहे.Body:जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा जुलै रोजी सायंकाळी एका 14 वर्षाच्या मुलीला पोळा चौकातून विक्की कदम, स्वप्निल गवई, प्रतिक बनकर यांनी पेशवाईचे काम आहे, असे म्हणुन अकोला रेल्वे स्टेशनवर नेले. त्यांना विक्रमसीगं रतनलाल सिसोदीया (रा. मध्यप्रदेश) व जायदाबी मोहम्मद हाशम भेटले. त्या सर्वानी अल्पवयीन मुलीला मध्यप्रदेशातील गु-हाडीया येथे नेवुन तेथील रतन नावाच्या व्यक्ती सोबत तिचे लग्न लावून दिले. यासाठी या चौघांनी रतनकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर ते सर्व जन परत गेले. त्यानंतर रतनने पत्नी म्हणून त्या अल्पवयीन मुलीशी जबरीने शारीरीक संबध स्थापन केले. तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण करून चटके ही दिले. विशेष म्हणजे, रतन याने अल्पवयीन पत्नीला सांगितले की, तुला ज्यांनी माझ्याकडे आणले त्यांना मी दोन लाख रुपये दिले आहे.
तत्पूर्वी आपली अल्पवयीन मुलगी दिसत नसल्याचे पाहून तिच्या आईने जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मुलीचा शोध सुरू असताना अल्पवयीन मुलीच्या मावशीला 24 जुलै रोजी रतन नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने तिला अल्पवयीन मुलीबाबत सांगितले. त्यानंतर मुलीची आई व इतर काही नातेवाईक व ओळखीचे हे मध्यप्रदेश येथे गेले त्यांनी मुलीला घरी आणले. त्यांनी ही माहिती जुने शहर पोलिसांना दिली. त्यावरून जुने शहर पोलिसांनी या घटनेचा तपास करीत यातील चार आरोपींना 12 तासाच्या आत अटक केली आहे. ही कारवाई जुने शहर पोलिस निरीक्षक प्रकाश पवार करीत आहे.

बाईट
प्रकाश पवार
पोलिस निरीक्षक, जुने शहर पोलिस स्टेशन.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.