ETV Bharat / state

Akola MLC Election : अकोला विधान परिषद निवडणुकीत दोन उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद - Mahavikas Aghadi Vs BJP in Akola election

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अकोला जिल्ह्यात विधान परिषदेची निवडणूक ( Akola Legislative Council elections ) हाेत आहे. गेल्या तीन टर्मपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. गतवेळी भाजप -शिवसेनेची युती हाेती. यंदा मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहारचा समावेश असलेली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप ( Mahavikas Aghadi Vs Shivsena in Akola election ) अशी चुरशीची लढत हाेणार आहे.

दोन उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद
दोन उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद
author img

By

Published : Dec 10, 2021, 7:03 PM IST

Updated : Dec 10, 2021, 7:21 PM IST

अकोला - अकोला विधान परिषदेच्या मतदानात आज 808 मतदारांनी ( voting in Akola MLC election ) मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत 98.30 टक्के मतदान झाले आहे. भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल ( BJP Candidate Vasant Khandelwal ) आणि सेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकीशन बाजोरिया ( Mahavikas Aghadi Candidate Gopikishan Bajoriya ) यांच्यात लढत झाली. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील अकोला वाशिम बुलढाणा विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतदानाला तीनही जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

हेही वाचा-MLC Election : नागपूर अन् अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात होणार निवडणूक

दोन उमेदवारांसाठी 822 मतदार
808 मतदारांपैकी 379 पुरुष आणि 429 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 22 मतदान केंद्रांवर हे मतदान झाले. भाजपकडून वसंत खंडेलवाल आणि शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपिकीशन बाजोरिया हे चौथ्यांदा निवडणुकीत उभे आहेत. 14 डिसेंबर रोजी मतमोजणी ( Akola MLC vote counting on 14th Dec ) होणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यात विधान परिषदेची निवडणूक हाेत आहे. गेल्या तीन टर्मपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. गतवेळी भाजप -शिवसेनेची युती हाेती. यंदा मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहारचा समावेश असलेली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत हाेणार आहे.

दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा विश्वास

हेही वाचा-आचारसंहितेचा फटका, रखडले मुंबईतील विकासकामांचे प्रस्ताव

निवणुकीतील अर्थपूर्ण लढतीचा फायदा कुणाला?

निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी बैठकी घेण्यात आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षातील मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी या दोन्ही उमेदवारांनी भरपूर 'अर्थपूर्ण' प्रयत्न केले आहेत. राजकारणापेक्षा अर्थकारणावर असलेल्या या निवडणुकीत नेमका कोणता उमेदवार बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. त्यामुळे अर्थकारणाचा नेमका फायदा कुणाला हे निवडणूकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

भाजप-शिवसेनेच्या गटबाजीचा फायदा कुणाला?

शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख ( Shivsena MLA Nitin Deshmukh ) व उमेदवार गाेपिकिशन बाजाेरीया यांचा गट आहे. दाेन्ही गट एकमेकांना काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडत नाहीत. आमदार देशमुख यांची ग्रामीण राजकारणावर पकड आहे. त्या तुलनेने आमदार बाजाेरीया महानगरातील राजकारणात जास्त सक्रिय आहेत. त्यामुळे या गटबाजीची परिणाम निवडणुकीवर कशा पद्धतीने झाला, हे १४ डिसेंबर राेजी निवडणूक निकालानंतरच दिसून येईल. भाजपमध्येही आमदार तथा जिल्हाप्रमुख रणधिर सावरकर व माजी पालकमंत्री तथा आमदार डाॅ. रणजित पाटील यांचे गट आहेत. भाजपमधील अनेक नेत्यांचे शिवसेनेशी राजकीय संबंध आहेत. परंतु, वसंत खंडेलवाल निवडून आल्यास भाजपमधील बड्या नेत्यांचे राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातून त्यांच्या उमेदवाराला नावापुरती मदत झाली असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा-legislative council elections 2021 : विधान परिषदेच्या दोन जागेंसाठी मतदान सुरू, कोण मारणार बाजी?

वंचित आणि अपक्षांचे मतदान ठरणार निर्णायक
अकोला जिल्हा परिषदेतील प्रमुख सत्ताधारी असलेल्या वंचित बहुजन आघाडीने ( Vanchit Bahuja Aghadi in Akola MLC election ) निवडणुकीबाबतची आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. तरी वंचित बहुजन आघाडी ही भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच शेगाव येथे सर्व सदस्यांची बैठकही झाली हाेती. भाजप वंचितला पूरक असलेली भूमिका जिल्हा परिषदमध्ये घेत असल्याचे विशेष सभेच्या पत्रावरून दिसून आले. आगामी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीत वंचितला सत्ता टिकवण्यासाठी भाजपची गरज लागणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची मते भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.

निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे 246 मतदार आहेत. काँग्रेसचे 191, शिवसेना-124, राष्ट्रवादी काँग्रेस -91, वंचित बहुजन आघाडी 86, एमआयएम - 07 आणि अपक्ष - अन्य मतदारांची संख्या 77 आहे. अशातच निर्णायक असलेल्या वंचित आणि अपक्षांची साथ कोणाला मिळते, यावरून दोन्ही उमेदवारांपैकी एका उमेदवाराचे विधान परिषदेचे दरवाजे उघडणार आहेत. त्यामुळे 98.30 टक्के झालेल्या मतदानावरून दोन्ही उमेदवार आता विजयाची वाट पाहत आहेत.

बार्शीटाकळी मतदान केंद्रावर सर्वात कमी मतदान
अकोला विधान परिषदेच्या 22 मतदान केंद्रावर मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान बार्शीटाकळी येथील मतदान केंद्रावर झाले आहे. 20 मतदारांपैकी 15 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजविला आहे. त्यासोबत मलकापूर या केंद्रावर 84.38 टक्के मतदान झाले आहे. तर शेगाव येथे 93.75 टक्के, बुलढाणा येथे 99.02, अकोला येथे 99.29 टक्के मतदान झाले आहे. बाकी 17 मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले.

Last Updated : Dec 10, 2021, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.