अकोला- आळशी प्लॉट येथील एका किराणा दुकानासमोर दोन पोलिसात फ्रिस्टाईल झाल्याची घटना काल घडली. कर्तव्यावर असलेला पोलीस दुकानासमोरील गर्दी पाहून नागरिकांना सामाजिक अंतर पाळायला सांगत होता. यावेळी साध्या कपड्यामध्ये पत्नीसोबत असलेल्या पोलिसाने कर्तृत्वावर असलेल्या पोलिसाला हटकले. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली.
कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला होत असलेली मारहाण पाहून नागरिक गोंधळले होते. हा वाद सुरू असताना दुकानदाराने दोघाही पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे आलेल्या नगरसेवकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा वाद विकोपाला गेला व त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. साध्या वेशातील पोलिसाच्या पत्नीने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला त्याच्याच काठीने मारहाण केली. दरम्यान, दोन्ही पोलीस असल्याने या घटनेबाबत कुठलीही कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. या प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा- अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 137 वर