अकोला - जिल्हा प्रशासनाकडे आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, यामुळे मृतांची संख्या 58 झाली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालात चार जणांमध्ये तीन महिला व एक पुरुष आहे. ते शिवसेना वसाहत, शंकर नगर, चांदुर खडकी व खडकी येथील रहिवासी आहेत.
बुधवारी रात्री उपचार घेताना दोघांचा मृत्यू झाला.त्यात कारंजालाड जि. वाशिम येथील 57 वर्षीय महिला असून ही महिला 16 रोजी रुग्णालयात दाखल झाली होती, तिचा बुधवारी मृत्यू झाला. अन्य एका 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती हरिहर मंदिर जवळ राहत होता. तो 11 जून रोजी दाखल झाला होता.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1096 वर पोहोचले असून 707 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 58 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 331 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्राप्त अहवाल-८४
पॉझिटिव्ह-०४
निगेटिव्ह-८०
कोरोना रुग्ण संख्येची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०९६
मृत-५८(५७+१)
डिस्चार्ज-७०७
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३१