ETV Bharat / state

वंचितच्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या दोन माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात मजबूत होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

mla left wanchit akola
पक्ष प्रवेश सोहळ्याचे दृश्य
author img

By

Published : Mar 8, 2020, 10:17 PM IST

अकोला- वंचित बहुजन आघाडीच्या माजी आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला असून यावेळी वंचितचे इतर पदाधिकारीही राष्ट्रवादीत सहभागी झाले. या पक्ष बदलामुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीला पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, यामुळे पक्षाला मोठे नुकसान होण्याची शक्यता नसल्याचे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.

वंचित बहुजन आघाडीमध्ये ग्रामपंचायत ते आमदारकी पर्यंत पद भोगणारे अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी पक्षांमधील हेवेदाव्यांना कंटाळून काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांच्यासोबत राज्यभरातील ४५ पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला होता. हे दोन्ही माजी आमदार नेमक्या कोणत्या पक्षात जातील असा प्रश्न उपस्थित होत होता. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे दोन्ही आमदार प्रवेश करतील अशी चर्चाही होती. ही चर्चा खरी ठरली असून सदर माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

दरम्यान, वंचित आणि भारिप बहुजन आघाडीच्या या दोन माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात मजबूत होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, या दोन्ही माजी आमदार व इतर पदाधिकाऱ्यांच्या जाण्यामुळे पक्षाला फारसा फरक पडणार नसल्याचे काही नेत्यांचे म्हणने आहे.

हेही वाचा- अकोल्यात अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात गुन्हे शाखेला यश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.