अकोला - दरोडा, जबरी चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या पाच जणांना दहशतवाद विरोधी पथकाने आज पातूर रोडवर अटक केली आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश असून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांवर जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पातुर रोडावर एक स्विफ्ट गाडीमध्ये क्रमांक एमएच 04 डीएन - 426 यामध्ये चार पुरुष व एक महिला असे पाच जण विलास प्रकाश काळे, कैलास धुंदन पवार, विजय कैलास पवार, सूरज विजु पवार, शीतल विलास भोसले हे त्यांच्या कारमध्ये होते. त्यांचा संशय आल्याने दहशतवाद विरोधी पथकाने त्यांची चौकशी केली. वाहनांची झडती घेतली. त्यामध्ये पोलिसांना तीन बॉटल पारा मर्क्युरी ऑक्सआइड, एक बॉटल ऐसिड, एक चाकू, एक दोर, मिरची पावडर, पाच मोबाइल, कार असा एकूण दोन लाख 93 हजार 520 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा - रायगड : सरकारचा निषेध व्यक्त करत पत्रकारांनी केले आत्मक्लेष आंदोलन