ETV Bharat / state

अकोट फाईलमध्ये दोन गोदामांना आग; लाखो रुपयांचे नुकसान - Akot fail scrap warehouse fire

अकोट फाईलमधील तीन टॉवरजवळ असलेल्या दोन गोदामांना आज दुपारी आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या लागल्या आहेत.

Warehouse fire Akot fail
अकोट फाईल स्क्रॅप गोदाम आग
author img

By

Published : May 31, 2021, 7:57 PM IST

अकोला - अकोट फाईलमधील तीन टॉवरजवळ असलेल्या दोन गोदामांना आज दुपारी आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या लागल्या आहेत.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - मुर्तीजापूर येथील कोरोना वॉर्डातील रुग्णांमध्ये रमतात भाजपचे आमदार पिंपळे

अकोट फाईलमध्ये समीर अहमद खान मौसम खान यांचे स्क्रॅपचे गोदाम आहे. तर, या गोदामाला लागूणच साबीर खान इस्माईल खान यांचे फर्निचरचे गोदाम आहे. स्क्रॅपच्या गोदामाला लागून असलेल्या कचऱ्याच्या ढिगाला आग लागली. त्यानंतर या आगीने रौद्ररूप धारण केले व दोन्ही दुकानातील साहित्याला आग लागली. पाहता पाहता या आगीने महाकाय रूप धारण केले. या आगीत या दोन्ही गोदामातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलास माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर घटनास्थळी अकोट फाईल पोलीस दाखल झाले होते. आग विझविण्यासाठी पाचपेक्षा जास्त बंबचा वापर होत आहे.

लाखो रुपयांचे साहित्य खाख

ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. परिसरातील मुलं या ठिकाणी सिगरेट पिण्यासाठी येत असल्याने त्यांच्याकडून पेटलेली काडी फेकल्याने ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आगीमध्ये दोन्ही गोदामातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झोले आहे. आधीच संचारबंदीमुळे दुकाने बंद असताना व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यात अशा घटनांमुळे त्यांचे आणखी नुकसान होत आहे. त्यामुळे, आता व्यापाऱ्यांना शासनाने सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा - अकोल्यात केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे आंदोलन, देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.