अकोला - हिवरखेड येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील गव्हाची गंज आणि घराला आग लागली. या आगीमुळे गहू पूर्णपणे जळून खाक झाला आहे तर घराचेही नुकसान झाले. ही आग कशामुळे लागली? याचा शोध पोलीस घेत आहेत.
शेतकरी अरुण राजूरकर यांच्या शेतात असलेल्या घराला आणि गहू या पिकाला आग लागली. ही आग नेमकी लागली कशामुळे याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, या आगीमुळे घराचे आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू तर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.