ETV Bharat / state

अकोल्यात दोन गटात हाणामारी; 12 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल - hiwarkhed police station

तेल्हारा तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला प्रचंड उधाण आले आहे. असे असताना महसूल विभाग आणि पोलीस विभाग याकडे 'अर्थपूर्ण' डोळेझाक करत आहे. सर्वप्रकारामुळे अवैधरेती वाहतूकदारांचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. यातूनच हिवरखेड येथे दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाले.

fighting in two group in akola
अकोल्यात दोन गटात हाणामारी
author img

By

Published : May 30, 2020, 2:53 PM IST

अकोला - परस्परविरोधी तक्रारीवरून दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी 12 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तेल्हारा तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला प्रचंड उधाण आले आहे. असे असताना महसूल विभाग आणि पोलीस विभाग याकडे 'अर्थपूर्ण' डोळेझाक करत आहे. सर्वप्रकारामुळे अवैधरेती वाहतूकदारांचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. यातूनच हिवरखेड येथे दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण बारा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

नाजीम खां नूर खां, भाऊ नसीम खां, नईम खां, नदीम खां हे शेतात जात होते. यावेळी या तिघांना आरोपींनी भोपळे विद्यालयासमोर गैरकायदेशीर मंडळी जमवून रेती वाहतुकीच्या कारणास्तव शिवीगाळ केली. तसेच लोखंडी फरशा, कुऱ्हाड, भाले, इत्यादी शस्त्रांनी मारहाण केली. यानंतर नाजीम खां यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जाहेर खां हाफिजउल्ला खा, फरहाद खां, दिलावर खां, जुबेर खां, जाहिद खां, मुजाहिद खां या सहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - एक जूननंतर कामावर गेल्यास बसणार दंड!

दुसरीकडे जुबेर खान फरहाद खां यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नदीम खां, नसीम खा, नईम खां, वसीम खां, नाझीम खा, यांनी गैरकायदेशीर मंडळी जमवून भोपळे विद्यालयासमोर तक्रारदार जुबेर खा याचा रस्ता अडवला. यानंतर रेतीच्या कारणावरून धमकी दिली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी फरशाने, लाठीने, जुबेर खां याच्या डोक्यावर हातावर मारून जखमी केले. यातील जखमींना उपचारार्थ अकोला येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

फिर्यादीच्या तक्रारी वरून हिवरखेड पोलीसांनी उपरोक्त सह आरोपींवरही विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.