अकोला - अकोल्यातील गरबा महोत्सवाला गालबोट लागले आहे. मुंगीलाल बाजोरिया प्रांगणावरील गरबा महोत्सव आटोपल्यानंतर मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.
मुंगीलाल बाजोरिया शाळेत दरवर्षी गरबा महोत्सव असतो. गरबा संपल्यानंतर गेटच्या बाहेर काही युवकामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यामध्ये मारहाण झाली. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला.
दरम्यान शांतता भंग केल्याच्या कारणावरून पोलिसांनी शिवम वीरेंद्रसिंग ठाकुर, तीळक उदयसिंग ठाकूर, अनुप सोनाजी वानखेडे, श्रेयस अशोक पांडे, अजय ठाकूर, यश मेहता आणि सूरज ठाकूर यांच्यावर 143, 147, 149, 160, 135 बीपी या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.