अकोला- १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. ही मुलगी सध्या तीन महिन्यांची गर्भवती आहे. हे प्रकरण सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून उघडकीस आले. वडील व मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. या बलात्कारी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एका गावात बापाने त्याच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मुलीचे पोट दुखत असल्याने तिच्या आईने तिला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीची तपासणी केल्यानंतर ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही बाब एमआयडीसी पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांना सांगितली. त्यांनी याप्रकरणी अत्याचारी बापाविरोधात भादंवि कलम ३७६, पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या नराधम बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला गेला आहे.
हेही वाचा- पातूरच्या शाळेत मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथविधी; विद्यार्थ्यांनी घेतला सत्तास्थापनेचा आनंद