ETV Bharat / state

साथीच्या आजारासोबतच विषबाधेच्या रुग्णांमध्ये भर; वैद्यकीय मनुष्यबळावर ताण

दरवर्षी ऑगस्ट महिन्यादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच खासगी रुग्णालयदेखील साथीच्या आजारांमुळे हाऊसफुल्ल असतात. मात्र, आता वेगळी परिस्थिती आहे. यंदा कोरोनाचे संकट आहे. जिल्ह्यातील सगळी आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांसाठी काम करत आहे. अशा बिकट परिस्थितीत यंदा साथीचे आजार होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले आहे.

अकोला
अकोला
author img

By

Published : Sep 2, 2020, 10:01 PM IST

अकोला - पावसाळ्यात सर्वत्र साथीच्या आजारांचे थैमान असते. मात्र, यंदा कोरोनाच्या बिकट परिस्थितीत साथीच्या आजारांवर रुग्णांनी घरीच उपचार केले. संचारबंदी उघडल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणाने आजारी रुग्णांसोबतच विषबाधेचे रुग्ण येत आहे. ही सर्व परिस्थिती हाताळताना मनुष्यबळाचा ताण असला तरी सेवा देण्यात आम्ही कुठलीच कमतरता ठेवली नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

अकोला

कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाला. नागरिकांना तब्बल ४ ते ५ महिने घरातच रहावे लागले. परिणामी हॉटेलमधील व उघड्यावरील पदार्थ खाणे बंद झाले. कोरोना संकटामुळे नागरिकांच्या आहारात सुधारणा झाली. शिवाय, व्यायाम व घरगुती उपचार घेण्यावर नागरिकांनी भर दिला. साथीचा आजार जडलाच तर घरगुती उपचार सुरू केले.

कोरोना काळात साथीच्या आजारांवर घरगुती उपचार रुग्णालयात (कोविड सेंटर वगळता) साधारणत: चारशेच्यावर खाटांची व्यवस्था आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच खासगी रुग्णालयदेखील साथीच्या आजारांमुळे हाऊसफुल्ल असतात. मात्र, आता वेगळी परिस्थिती आहे. यंदा कोरोनाचे संकट आहे. जिल्ह्यातील सगळी आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांसाठी काम करत आहे. अशा बिकट परिस्थितीत यंदा साथीचे आजार दिसून येण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले आहे.

हेही वाचा - संसर्गजन्य आजारांबरोबरच ग्रामीण भागातील लोक ठरतायेत अफवेचे बळी

कोरोना संकट येण्यापूर्वी रुग्णालयात दिवसाकाठी हजाराहून अधिक ओपीडी असायची. यातील ४० टक्के, किंबहुना त्यापेक्षा अधिक रुग्ण डेंग्यू, गॅस्ट्रो, मलेरिया, अतिसार, टाईफॉईड, विषबाधा या आजाराने बाधित असायचे. एवढेच नव्हे तर, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये साथीच्या आजारांमुळे आरोग्य पथक त्या गावात जाऊन सेवा द्यायचे. एवढे मोठे प्रमाण साथीच्या आजारांचे असायचे. यंदा मात्र महाविद्यालयातील ओपीडी निम्म्यावर आली असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले.

कोविड वार्डात मनुष्यबळ जास्त लावण्यात आले आहे. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष करता येत नसले तरी आम्ही कोविड आणि नॉन कोविड रुग्णांना वेळेवर उपचार देण्यासाठी तारेवरची कसरत करीत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले.

हेही वाचा - सोलापुरात कोरोना देवीचे मंदिर स्थापन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.