ETV Bharat / state

Employee Attempt Suicide in Akola : 20 ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचा मनपासमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न; अकोल्यात नेमकं काय घडलं? - महापालिकेसमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न

Employee Attempt Suicide in Akola : अकोला महापालिकेत हद्द वाढ झाल्यानंतर 20 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळी त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मनपामध्ये समाविष्ट करण्यात येणार होतं. मात्र, अद्यापही या कर्मचाऱ्यांना समाविष्ट न केल्यानं या कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत महापालिकेसमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.

कर्मचाऱ्यांचे मनपासमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न
Employee Attempt Suicide in Akola
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 7:50 PM IST

कर्मचाऱ्यांचा मनपासमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न

अकोला Employee Attempt Suicide in Akola : अकोला महापालिकेच्या (Akola Municipal Cooperation) हद्द वाढीतील कर्मचाऱ्यांना अजूनही मनपामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही. यामुळं या कर्मचाऱ्यांनी महापालिकेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस कर्मचारी आणि मनपा सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळं मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याठिकाणी 20 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

कर्मचाऱ्यांनी अनेकनेळा दिली निवेदने : अकोला महापालिकेत 20 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर तेथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मनपामध्ये समाविष्ट करण्यात येणार होते. परंतु, अद्यापही या कर्मचाऱ्यांना मनपामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही. या कर्मचाऱ्यांनी समाविष्ट करून घ्यावे, यासाठी अनेकवेळा बैठकी घेऊन निवेदन देत आपल्या व्यथा मांडल्या. तरीही त्यांना मनपात समाविष्ट करण्यात आलेलं नाही. या संदर्भात 116 कर्मचाऱ्यांपैकी 41 कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र शेवटी त्रुटी आणि तांत्रिक कारणांमुळे केवळ 26 कर्मचारीच पात्र ठरले. अधिवेशनात सुद्धा कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु अकोला महापालिकेनं अजूनही या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून घेतलं नाही. विशेष म्हणजे सरकार आणि न्यायालयानं महापालिकेला यासंदर्भात आदेश दिल्यानंतरही या आदेशाला मनपानं केराची टोपली दाखवलीय. (Employee Attempt Suicide in Akola)

पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात : आपली मागणी मान्य होत नसल्यानं या सर्व कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत, आपल्या कुटुंबासह महापालिका कार्यालयात सामूहिक आत्मदहनचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, अचानक झालेल्या या प्रकरामुळे मनपातील सुरक्षारक्षक तसंच पोलिसांची एकच तारांबळ उडाली. शेवटी पोलिसांनी मनपा सुरक्षारक्षकांच्या सहायाने या आंदोलकांना ताब्यात घेतलंय.

हेही वाचा :

  1. Action Against Rioters : नाशिक, अकोला, शेवगावातील दंगलखोरांवर कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश
  2. Crime News : मालमत्तेच्या वादावरुन मेव्हण्यावर भर चौकात जीवघेणा हल्ला
  3. Akola Crime : धक्कादायक! बाळापूर तालुक्यात १५ वर्षीय मुलीवर अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.