ETV Bharat / state

नियमित वीज पुरवठा नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना बसतोय 'करंट' - अकोला अनियमित वीज पुरवठा न्यूज

सध्या रब्बी हंगामालीत गहू, हरभरा पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी दिवसा विजेची अडचण असल्याने शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. त्यातही विजेचा लपंडाव सुरू असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Electricity Supply
वीजपुरवठा
author img

By

Published : Dec 15, 2020, 11:01 AM IST

अकोला - शेतकऱ्यांवर निसर्गाच्या अवकृपासोबतच वीज वितरण कंपनीचाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. रब्बी हंगामात हरभरा आणि गहू ही पीके सध्या शेतात आहेत. त्याला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. अकोल्यातील दप्तरी पिंजर, घोटा, बहीरखेड या ठिकाणी शेतकऱ्यांना अनियमित वीजेचा त्रास होत आहे. तर, या समस्या सोडवण्यासाठी नवीन अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी कामाला सुरुवात केली असल्याचे वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पवनकुमार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

अकोल्यात नियमित वीज पुरवठा होत नाही

वीज पुरवठ्यात अडचणी -

शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी विजेवर अवलंबून रहावे लागते. त्यासाठी जिल्ह्यात वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपावर जोडणी देण्यात आली आहे. गावातील डीपीवरून ही जोडणी दिलेली आहे. परंतु, या डीपीवर आणि ही डीपी ज्या सब स्टेशनवर आहे, त्याठिकाणी लोड असल्याने फ्यूज उडणे, फॉल्ट येणे, डीपी जळणे सारख्या अडचणी येत आहे. तिथेही दुरुस्तीचे काम निघत असल्याने विजेचा लपंडाव सुरूच असतो.

पिकांना पाणी देण्यास येते अडचण -

सध्या गव्हाला आणि हरभऱ्याला पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र, वीज वितरण कंपनीकडून नियमित वीज पुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी देणे अडचणीचे होत आहे. यावर कंपनीने तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच अपेक्षा असल्याचे दहीगाव गावंडे येथील शेतकरी अनंता गावंडे म्हणाले. शेतीसाठी पाणी हेच संजीवनी आहे. खासकरून रब्बी हंगामात शेतकरी आपले उत्पन्न वाढीसाठी शेतात राबतात. परंतु, वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचा उद्देश सफल होत नाही, असे शेतकरी सचिन बडोदे म्हणाले.

रात्रीच्या वेळी पाणी देताना अनेक समस्या -

रात्री सिंचन करतानाही ट्रान्सन्सफॉर्मरमध्ये कधी-कधी बिघाड होतो. वीज पंप किंवा मेनस्विचमध्ये ओल्या हाताने काम करणे जीवावर बेतण्याची शक्यता असते. साप, विंचू शिवाय जंगली जनावरांकडून विशेषतः रानडुक्कर, बिबट या वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची सर्वाधिक भीती आहे. यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रात्री सिंचन करावे लागत आहे.

ज्यांनी वीज बिल भरले नाही त्यांचीच ओरड -

शेतकऱ्यांना चार दिवस व तीन रात्री पिकांना पाणी देण्यासाठी वीज पुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी यापेक्षा वेगळे वेळापत्रक आहे. शेतातील कृषी वीज बिल माफ होईल या आशेने शेतकरी वीज बिल भरत नाही. ज्याठिकाणी असा प्रकार होतो, त्यांच्याकडे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुर्लक्ष करतात. वीज बिले न भरलेल्या शेतकऱ्यांचीच जास्त ओरड असल्याचेही बोलले जात आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रत्यक्ष भेटू शकले नाही, मात्र त्यांनी आपली फोनवरून माहिती दिली.

एकदम कृषी पंप सुरू झाल्याने येतो लोड -

जिल्ह्यात 70 हजारांपेक्षा जास्त कृषी पंप ग्राहक आहेत. एका डीपीवर अनेक कनेक्शन दिलेले आहे. वीजपुरवठा सुरू होताच सर्व कृषी पंप सुरू केले जातात. त्यामुळे एकदमच विजेचा लोड वाढून तो दीडपट होतो. त्याला पूर्वपदावर यायला वेळ लागतो. त्यामुळे वीज पुरवठा ट्रीप होणे, फ्यूज उडणे यासारख्या अडचणी येतात. वीज पुरवठा सुरू होताच विजेवर लोड वाढून नये यासाठी शेतकऱ्यांनी जरा वेळ थांबून पंप सुरू करावेत. असे केल्यास विजेचा लपंडावही थांबेल आणि डीपी, सबस्टेशनवरही अडचण येणार नाही, असे पवनकुमार कछोट यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. बार्शीटाकळी येथे अडचण आहे. परंतु, तीही दुरुस्त करण्यात आली असून तिथे असलेल्या अधिकाऱ्यांकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.