अकोला- देशभरामध्ये कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. अकोल्यात पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. डॉ अशिष गीरे हे अकोल्यातील पहिले लस घेणार पुरुष डॉक्टर ठरले आहेत. डॉ विजया पवनीकर या लस घेणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या आहेत. डॉ विजया पवनीकर यांनी सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून केले आहे.
अकोल्यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली. दरम्यान डॉ. आशिष गिरी पहिले लस घेणारे फ्रंट वारियर ठरले आहेत, तर पहिल्या महिला फ्रंट वॉरियर डॉ. विजया पवनीकर ठरल्या आहे. अकोला शहरात जिल्हा स्त्री रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महापालिकेने ठरविलेल्या ऑर्बिट हॉस्पिटल येथे आज लसीकरण करण्यात आले. दोन-दोन तासांच्या अंतराने प्रत्येकी पंचवीस जणांचा एक गट तयार करून आज तीनही सेंटरवर 300 जणांना लस देण्यात येणार आहे. पहिल्या महिला फ्रंट वॉरियर डॉ. विजया पवनीकर यांनी लस सर्वांनी घ्यावी, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे.
लसीकरनावेळी यांची होती उपस्थिती -
यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार डॉ. रणजीत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, डॉ. आरती कुलवाल यांच्यासह आदी वैद्यकीय अधिकारी व उपस्थित होते.